

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
विधानसभा निवडणुकांसाठी मंगळवार, २२ तारखेपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र, अनेक विद्यमान उमेदवारांनी गुरुपुष्यामृत योग साधत गुरुवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात भाजपच्या एकूण २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
यात प्रामुख्याने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आदी नेत्यांचा समावेश आहे. यातील अनेक नेत्यांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले.
मंत्री लोढा यांनी मलबार हिल मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कांदिवली पूर्व मतदारसंघातून विद्यमान आमदार अतुल भातखळकर यांनी अर्ज दाखल केला. त्यासोबतच, अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी भाजपचे अमित साटम यांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरला.
याशिवाय, मुलुंडमधून आमदार मिहीर कोटेचा यांनी मुलुंड पूर्व हनुमान नगर ते आयटीआयपर्यंत रोड शो काढत शक्तिप्रदर्शन करत आपला अर्ज भरला. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांनी विमानतळ कॉलनी येथील समाज कल्याण हॉल येथे आपला अर्ज दाखल केला.
अंधेरी पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार अमित साटम यांनीही आपला अर्ज दाखल केला. वडाळा मतदारसंघातून कालिदास कोळंबकर यांनीही आपला अर्ज भरला. याशिवाय, कोथरूड येथून चंद्रकांत पाटील, शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल, नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित, धुळे मतदारसंघातून अनुप अगरवाल, शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा,
धामणगाव रेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड, हिंगणघाट मतदारसंघातून समीर कुणावार, गोंदिया मतदारसंघातून विनोद अग्रवाल, राळेगावमधून अशोक उके, किनवटमधून भीमराव केराम, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, बदनापूर येथून नारायण कुचे, गंगापूर येथून प्रशांत बंब, शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील, तुळजापूर येथून राणा जगजीतसिंह पाटील, सोलापूर दक्षिण येथून सुभाष देशमुख, कराड दक्षिण येथून अतुल भोसले, कोल्हापूर दक्षिण येथून अमल महाडिक आणि सुधीर दादा गाडगीळ यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
गावित, धुळे मतदारसंघातून अनुप अगरवाल, शिरपूर मतदारसंघातून काशीराम पावरा, धामणगाव रेल्वे मतदारसंघातून प्रताप अडसड, हिंगणघाट मतदारसंघातून समीर कुणावार, गोंदिया मतदारसंघातून विनोद अग्रवाल, राळेगावमधून अशोक उके, किनवटमधून भीमराव केराम, हिंगोलीतून तान्हाजी मुटकुळे, बदनापूर येथून नारायण कुचे, गंगापूर येथून प्रशांत बंब, शिर्डीतून शहादा या राखीव मतदारसंघातील भाजप उमेदवार आमदार राजेश पाडवी यांनी अर्ज दाखल केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सकाळी ११ वाजता दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून आपला सलग सहाव्यांदा अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी संविधान चौक ते आकाशवाणी चौक येथून सकाळी ९.३० वाजता नामांकन रॅली काढण्यात येणार आहे.
त्यानंतर प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फडणवीस आपला अर्ज दाखल करतील. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यापूर्वी प्रिया मंदिर ते खार पश्चिम येथे मिरवणूक काढण्यात येणार आहे.