दक्षिण सोलापूर : मतदारसंघातील शेतकर्यांच्या कल्याणासाठी मी अहोरात्र मेहनत घेतली, यापुढेही घेणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले. काँग्रेसने सहकार चळवळ गरिबांपर्यंत पोहोचू दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
आ. देशमुख यांनी गुरूवारी मतदार संघातील डोणगाव, मनगोळी, अकोले मंद्रूप, गुंजेगाव, कंदलगाव, अंत्रोळी, वडापूर, कुसुर, खानापूर, तेलगाव, विंचूर, निम्बर्गी, औराद गावांना भेट देऊन कॉर्नर बैठका, जाहीर सभा घेतली. गावोगावी आ. देशमुख यांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
आ. देशमुख पुढे म्हणाले की, सहकाराच्या माध्यमातून आपण गावागावात आर्थिक चळवळ उभा केली. कोणत्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न ठेवता सहकाराच्या माध्यमातून शेतकर्यांना पाठबळ दिले. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या बेछूट आरोपाला ग्रामीण भागातील मतदार उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार शेतकर्यांच्या हितासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीर उभे आहे. महायुतीने सत्तेत आल्यावर शेतकरी सन्माननिध मध्ये वाढ केली जाणार आहे. शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचा निर्धारही केला आहे, म्हणून शेतकर्यांच्या पाठीशी उभा राहणार्या महायुतीला विजयी करावे, असे त्यांनी आवाहन केले.