न्यूयॉर्कच्या 'इंडिया परेड'मध्ये दणाणला ढोलताशांचा आवाज

'डेट्रॉईट'च्या शिलेदार ढोलताशा पथकाने जिंकली उपस्‍थितांची मने
India Day Parade in New York City
न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये सादरीकरण करताना मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोलताशा पथकाचे वादक.Pudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये मराठी मंडळ 'डेट्रॉईट'च्या शिलेदार ढोलताशा पथकाने आपल्या जोमदार सादरीकरणाने उपस्‍थितांची मने जिंकली. १५ ऑगस्टनंतर येणाऱ्या रविवारी अमेरिकेत भारत दिन ( इंडिया डे ) साजरा करण्याची परंपरा आहे . यंदाच्या ४२ व्या भारत दिनाचे औचित्य साधून न्यूयॉर्कच्या मॅनहटन प्रभागात आयोजित भारताबाहेरील सर्वात मोठा उत्सव उदंड उत्साहात साजरा झाला . यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत राममंदिर प्रतिकृतीसह विविध विषयांना गवसणी घालणाऱ्या पन्नासहून अधिक चित्ररथ आणि चाळीस बँड्स चा समावेश होता.

India Day Parade in New York City
न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये सादरीकरण करताना मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोलताशा पथकाचे वादकPudhari Photo

संपूर्ण अमेरिकेतून एक लाखांहून अधिक भारतीय हा उत्सव अनुभवण्यासाठी न्यूयॉर्क मध्ये जमा झाले होते. रविवारी सकाळी अकरा वाजता सुरु झालेल्या या सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या मिरवणूकीची तब्बल सहा तासांनी सांगता झाली . फेडरेशन च्या पदाधिकाऱ्यांसह प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी , सोनाक्षी सिन्हा , मनोज तिवारी यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली.

India Day Parade in New York City
न्यूयॉर्कच्या इंडिया परेडमध्ये सादरीकरण करताना मराठी मंडळ डेट्रॉईटच्या शिलेदार ढोलताशा पथकाचे वादक Pudhari Photo

शिलेदार ढोलताशा पथकाने जिंकली उपस्‍थितांची मने

मूळचा हुपरी चा ( जि. कोल्हापूर) असणाऱ्या प्रणव औंधकर याने शिलेदार ढोलताशा पथकाची डेट्रॉईट मराठी मंडळाअंतर्गत सहा वर्षांपूर्वी स्थापना केली आहे. प्रणव हा हुपरीचे स्व.शंकर औंधकर (सर ) व स्व. औंधकर बाई यांचा नातू असून, आठ वर्षांपासून अमेरिकेत डिझाईन इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. यावेळी शिलेदार ढोलताशा पथकाने ऋतुजा कांबळे , सुरेखा पोकळे , प्रांजली आढाव , साईनाथ जाधव , अमृता पळशीकर , अद्वय पळशीकर, युवान वायकोळे , विहान जोशी , यश घुले , मिहित जोशी , वारूथिनी चौगुले , अथर्व , आर्यन केदार डोंगरकर आदींच्या समर्थ साथीने साठ हुन अधिक वादकांसह आसमंत दणाणून सोडला. उपस्थित भारतीयांसह उत्सव बघण्यास आवर्जून आलेले अमेरिकन्स व इतर देशांचे प्रेक्षक देखील "जय भवानी, जय शिवाजी"चा जयघोष करत परेडमध्‍ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. सुमारे दीडशे अमेरिकन वाहिन्या व शेकडो व्लॅागर्सनी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले. या सक्रीय सहभागाबद्दल शिलेदार ढोलताशापथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news