नगर : पुढारी वृत्तसेवा
भिंगार शहरालगत असणाऱ्या आलमगीर परिसरातील ब्रह्मतळे येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. १०) दुपारी घडली. याबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अजमत जावेद शेख (वय १३, रा. आलमगीर नागरदेवळे, भिंगार), मोहम्मद साद अन्सारी (वय १६, रा. सदर बाजार, भिंगार) असे मृत मुलांची नावे आहेत. शेख आणि अन्सारी दोघेही भिंगार हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते. ते दोघे आज दुपारी ब्रम्हतळे येथे पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
ही घटना परिसरातील नागरिकांनी पाहिली. त्यांनी तत्काळ धाव घेऊन त्या दोघांना बाहेर काढले. त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मयत घोषीत केले. मिलिट्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या खबरीवरून भिंगार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.