

नगर: पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात विधानसभा निवडणूक शांततेत पार पड़ावी आणि कायदा व सुष्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. गुन्हेगारांचर शापं वाँच ठेवण्याची तयारी झाली असून, गेल्या दहा महिन्यांत ४६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३५ पिस्तूल आणि १२६ जणांकडून कोयता, तलवार, सत्तूर, चाकू अशी शस्त्रे जप्त केली आहेत.
पोलिसांनी आतापर्यंत १६२ जणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आता निवडणुकीच्या अनुषगनि पोलिस आणखी गुन्हेगारांची जंत्री जमवीत आहेत. जिल्ह्यातील निवडणुकांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता अनेक अनुचित पटना निवडणूक काळात आणि निवडणूक झाल्यानंतर पडल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलिस दल प्रयत्नशील आहे.
रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि डिस्ट्रीशिटर यांची जंत्री जमविण्याचे काम पोलिस दलाकडून सुरू आहे. दुसरीकडे आतापर्यंत विविध गुन्ह्यांतील १६२ सराईत आरोपीना जिल्ला पोलिस दलाने हदपार केले आहे. त्यात सराईत गुन्हेगार, त्यांच्या टोळ्या व दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांचा समावेश आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून प्रत्येक पोलिस ठाणे व उपविभागीय कार्यालयाकडून आढावा घेण्याचे काम सुरू आहे. कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांची दहशत आहे, निवडणुकीच्या काळात काही अनुचित प्रकार यडू शकतो का,
याची गोपनीय माहिती घेण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सुमारे १७ हजार जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, १८ जणांविरुद्ध एमपीडीए' नुसार कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जिल्हा पोलिस दलाने जानेवारी ते सप्टेंबर अशा दहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात पिस्तूल बाळगणान्या ४६ जणांना अटक करून त्यांच्याकडून ३५ पिस्तूल जा केले आहेत.
तलवारी, कोयते, सत्तूर, चाकू, गुत्री अशो धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या १२६ जणांनाही अटक करून त्यांच्याकडून १४४ शत्रे जा केली आहेत, आता निवडणुकीच्या काळात व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
तोफखाना १४, कोतवाली १४, भिंगार १४, एमआयडीसी ४, नगर तालुका ५, सुपा १, सिडी १०, कोगरगाव शहर २, कोपरगाव तालुका ७, लोणी ४. राहाता ३. श्रीरामपूर शहर २४. श्रीरामपूर तालुका २. राहुरी १९, जामखेड ७, कर्जत २, बेलवंडी २, मिरजगाव १, खर्दा १, श्रीगोंदा ३, सोनई पार्टी ७. शेवगाव ३, नेवासा ५, संगमनेर शहर ६, संगमनेर तालुका ६
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतील सराईत गुन्हेगार आणि दहशत निर्माण करणाऱ्या सुमारे १३७ सराईत गुन्हेगारांचे ब्रीपारीचे २०२३ ते २०२४ मधील सुमारे १३७ प्रस्तान उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत.
निवडणुकीच्या काळात ते प्रस्ताव निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यात सर्वाधिक ३३ प्रस्ताव नगर शहर उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी स्तरावर प्रलंबित आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत पोलिसांनी सुमारे ४४ गुटखा तस्करांवर कारवाई केली असून, याबाबत विविध पोलिस ठाण्यांत ३१ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सुगंधी तंबाखू गुटखा, पान मसाला यांचा समावेश आहे. अनेक गुन्ह्यांत जिल्ह्यात परराण्यातून गुटखा येत असल्याचे तपासात निष्पत्र झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १३९ अधिकारी व २ हजार १४० पोलिस अंमलदारांचा बंदोबस्तासाठी समावेश करण्यात आला आहे.
निवडणुकीसाठी बाहेरून ११० पोलिस अधिकारी न तीन हजार ६६ पोलिस येणार आहेत. तसेच, पोलिसांच्या मदतीसाठी सुमारे तीन हजार होमगार्डचा बंदोबस्त गाणार आहे.
निवडणूक काळात शांतता व सुव्ययाथा अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रयत्नशील आहेत. परंतु, कुठेही अनुचित प्रकार घडल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.
राकेश ओला, पोलिस अधीक्षक