जनतेचा घसा कोरडा; जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा

जनतेचा घसा कोरडा; जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  सध्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. राहाता तालुक्यात देखील टँकर सुरू झाला आहे. श्रीरामपूर व राहुरी वगळता 12 तालुक्यांतील 6 लाख 39 हजार 175 लोकसंख्येला 345 टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक 105 टँकर सुरू आहेत. दर वर्षी एप्रिल व मे महिन्यात संगमनेर, नगर, पारनेर व पाथर्डी तालुक्यांतील काही गावांना पाणीटंचाई परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झालेली आहे. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या वाढलेली दिसत आहेत. आजमितीस श्रीरामपूर व राहुरी तालुके वगळता सर्वच तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात टँकर सुरू आहेत.
पाथर्डी तालुक्यातील 87 गावे आणि 455 वाड्यांत पाणी परिस्थिती गंभीर आहे.

त्याखालोगाल पारनेर, कर्जत, संगमनेर तालुक्यात पाणीटंचाई तीव्र आहे. पावसाळा लांबल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. सध्या पाथर्डी, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा व शेवगाव या नगरपालिका व नगरपंचायतींना देखील पाणीटंचाईचे चटके बसले आहेत. कर्जत नगरपालिकेत 11 तर पाथर्डी नगरपालिका क्षेत्रात 6 टँकर धावत आहेत. या पाच नगरपालिका क्षेत्रांसह जिल्ह्यातील 333 गावे आणि 1 हजार 769 वाड्यांत पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. त्यामुळे या गावांतील 6 लाख 39 हजार 175 लोकसंख्येला 345 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

तालुकानिहाय टँकर संख्या

संगमनेर : 28, अकोले : 6, कोपरगाव 7, नेवासा 5, राहाता 1, नगर 33, पारनेर 39, पाथर्डी 111, शेवगाव 17, कर्जत 52, जामखेड 26, श्रीगोंदा 20.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news