नगर: पुढारी वृत्तसेवा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा या उपक्रमांच्या प्रयोगशाळा बनल्या असून विविध ऑनलाईन कामे व अनावश्यक उपक्रमांमुळे शिक्षकांना विद्याध्यांपुढे जाऊन शिकवायला वेळच मिळत नाही, अशी कैफियत मांडत प्राथमिक शिक्षकांनी 'आम्हाला शिक या असा टाहो फोडला.
जिल्ह्यातील ३५०० शाळांतील सुमारे दहा हजार शिक्षकांनी बुधवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता विल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या समन्वय समितीतर्फे काढलेल्या या मोर्चाला खासदार नीलश लंके आणि आमदार सत्यजित तांबे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शिक्षकांचे निवेदन स्वीकारले. शिक्षण विभागात विविध प्रयोग राबवले जात आहेत आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षकांना वेठबिगारासारखे बापरले जाते. त्यामुळे शिक्षकांकडे शिकवण्यासाठी वेळच शिल्लक नाही. त्यामुळे अशी अशैक्षणिकल कामे कमी करावीत, शालेय पोषण आहाराच्या बदललेल्या पाककृतीमुळे शिक्षकांच्या अशैक्षणिक कामात भरच पडली आहे:
ही योजना स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी, १०-२०-३० वर्षे सेवेनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, मुख्यालयी राहण्याची अट शिथील करावी, यांसह इतर अनेक मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांनी हा मोर्चा काढला.
शिक्षकांच्या अनेका प्रत्रांचावत शासनाकडून कोणतीही अनुकूल भूमिका घेतली जात नाही, अशा व्यथा त्यांनी मांडल्या, खासदार नीलेश लंके म्हणाले, की मी शिक्षकाचा मुलगा असून शिक्षकांच्या अडीअडचणी मला माहीत आहेत, त्यामुळे मी शिक्षकांचे प्रत्र दिल्लीत मांडणार आहे. आमदार सत्यक्ति तांबे म्हणाले, शिक्षकांना ऑनलाईन व अन्य काने देऊन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून बंचित ठेवायचा सरकारचा डाव आहे. यावर मी आवाज उठवणार आहे.
शिक्षक समन्वय मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, अहमदनगर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचे राजेंद्र ठोकळ, बापूसाहेब तांबे, राजेंद्र शिंदे, डॉ. संजय कळमकर, साहेबराव अनाप, बाळू सरोदे, प्रवीण दुबे, भास्करराव नरसाळे, अर्जुन शिरसाट, सुरेश निवडुंगे, सीताराम सावंत, बबन गाडेकर, दत्ता कुलट, विद्याताई आढाव, बाळासाहेब सालके, प्रवीण झावरे, कल्याण लवांडे, गोकुळ कळमकर, बाळासाहेब खिलारी, अशोक नवसे, शरद बांडेकर, संतोष युसुंगे, सुनील शिंदे, संजय धामणे, संजय नळे, एकनाथ व्यवहारे, सचिन नाबगे, सुनील पवळे, नारायण पिसे, अनिल अंधाळे, बाळासाहेब देंडगे आदी उपस्थित होते.
शाळाबाहड़ा व ऑनलाईन कामाच्या ओझ्याखाली शिक्षक दमून गेला आहे. विविध सर्वेक्षणे, शाळास्तरावर वेगवेगळ्या ११ समित्यांची बैठक घेणे, इतिवृत्त करणे, आवश्यक मालाचा पुरवठा नसताना बदललेल्या पाककृतीप्रमाणे पोषण आहार देण्याचे अनाकलनीय आदेश, अत्यंत कमी शिलाई खर्चामध्ये गणवेश शिवून घेणे अशी कामे शिक्षकांच्या माथी मारलेली आहेत. त्यामुळे शिकवण्याच्या मूळ कामापासून शिक्षक दूर गेल्याची खंत शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी नगर महापालिका, झेडपी व नगरपालिका हद्दीतील २५४५ शाळांतील सुमारे १० हजार शिक्षकांनी बुधवारी सामूहिक रजा टाकली होती. मात्र सर्वच शाळा बंद नव्हत्या. अनेक शाळा शिक्षक उपस्थित असल्याने सुरू होत्या, अशी माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली