Nagar : पुणतांबा जंक्शनवर दोन जलद गाड्यांना थांबा

अमरावती-पुणे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन जलद गाड्यांना पुणतांबा येथे थांबा देण्यात आला
Indina Railway
गाड्यांना थांबा file photo
Published on
Updated on

स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांसाठी केलेला रेल रोको आंदोलन आणि रेल्वेमंत्र्यांच्या भेटीनंतर पुणतांबा जंक्शन स्थानकाला थांबा मिळाला आहे. यामुळे ग्रामस्थात समाधान व्यक्त केले जात आहे. शुक्रवारीपासून अमरावती-पुणे आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या दोन जलद गाड्यांना पुणतांबा येथे थांबा देण्यात आला आहे. दौंड मनमाड मार्गावरून अन्य काही जलद गाड्यांना शिर्डीहून मानमाड कडे जाणाऱ्या येथे लवकरच थांबा असे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी दोन भुयारी मार्गातील त्रुटि लवकरच दूर करण्यात येतील आणि नवीन फाटक केलेल्या रस्त्यातील त्रुटी दूर करण्याचे कामही सुरू झाले आहे. पुणतांबा शिर्डी रेल्वे मार्गामुळे येथील स्थानकाला दहा वर्षापूर्वी जंक्शनचा दर्जा मिळालेला असला तरी पूर्वी थांबा असलेल्या अनेक गाड्यांचा थांबा बंद केलेला आहे. पुणतांबा शिर्डी, सरला बेट, श्री चिदम्बर स्वामी अशी अनेक धार्मिक स्थळे येथून जवळ आहे. तसेच राज्याची दक्षिणकाशी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथे शेकडो भाविक धार्मिक विधी व दर्शनासाठी येत असतात. जगाच्या पटलावर पोहवलेले शिर्डी गाव पुणतांबा येथून केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांना हा जवळचा मार्ग आहे. मात्र तरी पुणतांबा रेल्वे स्थानकावर फक्त एकच रेल्वे गाडी थांबत होती. भाविकांसह पुणतांबा परिसरातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय त्यातून होत असल्याने निदर्शनास येताच १५ ऑगस्टला ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन केले. पुणतांबेकरांसह परिसरातील सहा गावातील ग्रामस्थ त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पांची भेट घेत जलद गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली होती. गत आठवड्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव शिर्डीत आले असता त्यांचीही भेट घेत गावकऱ्यांनी रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी केली मंत्री वैष्णव गांनी लगेचच पुणे विभागाच्या सरव्यवस्थापक थांचा देण्याची सूचना केली होती.

भुयारी मार्ग की उड्डाणपूल, अद्याप निर्णय नाही

दीड-मनमाड मार्गावरील नानेक ठिकाणचे रेल्वे फाटक चंद करून भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले असताना पुणतांबा येथे भुयारी मार्ग की उड्डाणपूल याबाबतअद्यापही निर्णय झालेला नाही. गत आठ वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे. रेल्वे प्रशासनाने त्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news