Ahamadnagar News | न्यू भरत हॉटेलमधील कुंटणखान्यावर छापा

चालकासह दोघे अटकेत; तीन महिलांची सुटका
Ahamadnagar News
Ahamadnagar News File Photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

राहुरी ते नगर रस्त्यावरील न्यू भरत हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व राहुरी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून छापा घातला असता दोघांना ताब्यात घेतले. तर, तीन महिलांची सुटका केली. ही कारवाई शुक्रवारी रात्री झाली. विक्रम सुरेश विशनानी (वय २७, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी), फराद अहमद सय्यद (वय ३८, रा. राहुरी, ता. राहुरी) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आहेर यांनी पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, सारिका दरेकर, रणजित जाधव यांचे पथक नेमूण कारवाईसाठी रवाना केले होते.

पथकातील उपनिरीक्षक तुषार धाकरावर यांना शुक्रवारी (दि. १८) रोजी माहिती मिळाली की, राहुरी-नगर रस्त्यावरील न्यू भरत हॉटेलवर एक व्यक्ती महिलाकरवी कुंटणखाना चालवित आहे. याबाबत राहुरीचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना कळविले. राहुरी पोलिस अंमलदार एकनाथ आव्हाड, विकास साळवे, जालिंदर साखरे यांना बरोबर घेत पोलिस कारवाईसाठी रवाना झाले.

हॉटेलवर कुंटणखान्यावर खात्री करण्यासाठी पोलिस अंमलदार बनावट ग्राहक म्हणून गेले. खात्री पटताच पथकाने छापा घालून विक्रम विशनानी यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता २० हजारांचा मोबाईल व एक हजार असा एकूण २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

विक्रम सुरेश विशनानी याच्यासह हॉटेलची पाहणी करीत असताना फराद अहमद सय्यद हा मिळून आला. हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये ३ महिला मिळून आल्या. त्या महिलांकडे विचारपूस केली असता आम्हास वेश्या व्यवसाय करून ग्राहकाकडून पैस घेऊन, त्यामधून आम्हास पैस देतात.

आमच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतात. वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर आमची उपजीविका चालते, अशी माहिती सांगितली. त्यानंतर पथकाने त्या महिलांची सुटका केली. वरील दोन आरोपी स्वतः च्या आर्थिक फायद्याकरिता तीन महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजीविका करताना मिळून आले.

आरोपीविरुद्ध महिला पोलिस कॉन्स्टेबल सारिका दरेकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात स्त्रिया व मुली यांच्या अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news