पुंडलिक महाराजांना राज ठाकरेंच्या नावे खंडणीची धमकी

पोलीसांकडून आरोपीचा शोध
Pundalik Maharaj threatened with extortion in favor of Raj Thackeray
पुंडलिक महाराजांना राज ठाकरेंच्या नावे खंडणीची धमकी File Photo
Published on
Updated on

नगर : श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सदस्य हभप पुंडलिक महाराज थेटे यांना मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने तोंडाला काळे फासण्याची धमकी देत एक लाख रुपये खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. नगरनजीकच्या शेंडी येथील दत्त मंदिरात ही घटना घडली. थेटे महाराजांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तो शून्य क्रमांकाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

थेटे महाराज हे संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे सदस्य आहे. गत चार वर्षापासून पालखी प्रमुख म्हणून ते कार्यरत होते. हभप कांचन जगताप यांच्या अध्यक्षतेखाली दिंडी पंढरपूरकडे चालली आहे. निवृत्तीनाथ महाराज संस्थानचा विश्वस्त म्हणून थेटे महाराजांनी काम केलेलेे आहे. 2 जुलै 2024 रोजी पालखी सोहळा छत्रपती संभाजीनगर रस्त्याने नगरकडे येत असताना शेंडी येथील दत्त मंदिरात थांबलेली होती. दुपारी एक वाजता अनोळखी मोबाईल क्रमांकावरून थेटे महाराजांना कॉल आला. तो त्यांनी उचलला नाही. त्यांनतर पुन्हा त्याच क्रमांकावरून फोन आला. तो उचलला असता समोरील व्यक्ती म्हणाली, 'तुम्हाला आमच्या राज ठाकरे साहेबांची काही अ‍ॅलर्जी आहे का', त्यावर 'मला त्यांची काही अ‍ॅलर्जी नाही, असे थेटे महाराज म्हणाले. त्यानंतर 'तुम्ही सध्या कोठे आहात तुमचे लोकेशन कोठे आहे, तुमच्या तोंडाला अहमदनगरचे मनसेचे कार्यकर्ते काळे फासतील', असा दम दिला.

नाहीतर तुला जिवे मारून टाकीन',

'जर तुला हे संकट टाळायचे असेल तर एक लाख रुपये दे, नाहीतर तुला जिवे मारून टाकीन', अशी धमकी दिली. पुन्हा त्याच क्रमांकावरून दीड वाजता फोन आला व जीवे मारण्याची धमकी दिल्याचे थेटे महाराजांनी फिर्यादीत म्हटले आहे. थेटे महाराजांनी हा प्रकार अध्यक्षा हभप कांचन जगताप यांना फोन करुन कळविला. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news