फसव्या योजनांवर जनता विश्वास ठेवणार नाही ! : आमदार प्राजक्त तनपुरे

; धामोरी येथे साडेतीन कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ
prajkt tanpure
प्राजक्त तनपुरेFile Photo
Published on
Updated on

लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी बहिणींना खुश करण्याचे फसवे आमिष दाखवले जात आहे, परंतु यासाठी लागणारे 45 हजार कोटी रुपये हे सरकार सर्वसामान्यांच्याच खिशातून काढणार आहे त्यामुळे या फसव्या सरकारच्या फसव्या योजनांवर सर्वसामान्य जनता विश्वास ठेवणार नाही आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार जनता निवडून देईल, असा विश्वास माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. राहुरी तालुक्यातील धामोरी येथे 3 कोटी 62 लक्ष रुपयांचे विविध विकास कामांचे लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक रुईचंद पारखे हे होते.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना मंत्री तनपुरे पुढे म्हणाले की, धामोरीतील नागरिकांनी माझ्यासह संपूर्ण तनपुरे कुटुंबाला कायमच साथ दिली आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आमदार झालो. पवार साहेबांनी पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदाराला मंत्रीपद दिले. मी मंत्री असताना दोन वर्ष कोरोनात गेली आणि लगेच खोके सरकार आले. त्यानंतर अनेकवेळा माझ्यावर पक्ष बदलण्यासाठी दबाव आला, परंतु मी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलो. मला मिळालेल्या सत्तेचा सर्वसामान्य जनतेसाठी वापर केला. धामोरीसह सहा गावांची पाणी योजना स्वतंत्र मंजूर केली. परिसरात नवीन रोहित्र, सौरऊर्जा प्रकल्प त्याचबरोबर रस्ते डांबरीकरण, वांबोरी चारी यासारख्या कामांना मी प्राधान्य दिले, परंतु या खोके सरकारने अक्षरशः खोक्यांची लयलूट केली आणि आता स्वतःची लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी फसव्या योजनांचे आमिष हे सरकार दाखवत आहे. या आमिषाला जनता बळी पडणार नाही व महाविकास आघाडीचे सरकारच पुन्हा सत्तेत येईल, असे आमदार तनपुरे यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, वांबोरीचे उपसरपंच नितीन बाफना, बाबासाहेब सोनवणे, प्रशांत नवले,संदिप निकम, बाबासाहेब चौधरी,प्रदिप सोनवणे, भास्कर जाधव, अमोल कोल्हापुरे,शुभम सोनवणे, विकास हरिचंद्रे, विठ्ठल सोनवणे, देवराम आरसुरे ,रावसाहेब सोनवणे, एकनाथ वाडगे, अनिल माने, नितीन कदम ,शिवाजी उगले, भारत कलापुरे ,गोविंद खेडकर, आप्पा सोनवणे ,भाऊसाहेब जाधव, अभय सोनवणे,विठ्ठल सोनवणे, शिवाजी खेडेकर, उत्तम ढगे, नितीन कदम, अशोक बकरे, भाऊसाहेब जाधव, हरीभाऊ कुसमुडे, उत्तम उगले आदींचे शेकडून ग्रामस्थ उपस्थित होते.

लाडक्या दाजींना पाच हजार कोटी देऊ!

आगामी निवडणुकांमध्ये जनता महाविकास आघाडी सरकारला साथ देणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येताच लाडक्या दाजींसाठी पाच हजार कोटी रुपये देणार असल्याचेही तनपुरे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news