नगर महापालिका आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात

बांधकाम परवानगीसाठी मागितले आठ लाख
Bribery case
नगर महापालिका आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यातPudhari File Photo

नगर; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम परवानगीसाठी बांधकाम व्यावसायिकाकडून आठ लाखाची लाच मागितल्याच्या आरोपावरून महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे आणि त्यांचा स्वीय सहायक श्रीधर देशपांडे लाचलुचपतच्या जाळ्यात अडकले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील अधिकाऱ्यांनी डॉ. जावळे यांचे दालन आणि निवासस्थान सील कले असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, डॉ. जावळे व देशपांडे पसार झाल्याचे समजते. अहमदनगर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच आयुक्त दर्जाच्या डॉ. पंकज जावळे अधिकाऱ्याच्या गळ्याला लाचेचा फास लागला असून, आतापर्यंतची महापालिकेतील ही सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

जालना येथील अँटी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांनी दिलेली माहिती अशी, की बांधकाम परवानगीसाठी डॉ. जावळे यांनी देशपांडे यांच्यामार्फत ९ लाख ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित कार्यालयाकडे १९ जून रोजी केली. त्यावरून जालना कार्यालयाने दि. १९ जून आणि २० जून २०२४ रोजी पडताळणी केली. त्यावरून डॉ. जावळे व देशपांडे यांच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी महापालिकेतील आयुक्तांचे दालन सील केले असून, त्यांचे शासकीय निवासस्थानही सील केल्याचे समजते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news