Nagar Black Magic | सोन्याची पेटी शोधण्यासाठी जादुटोणा : जेसीबीने खड्डा खोदताना सहाजणांना रंगेहात पकडले

राजूरात भरवस्तीत सुरु होता प्रकारः जादूटोणा प्रकरणी गुन्हा दाखल
जेसीबीने खड्डा खोदताना सहाजणांना रंगेहात पकडले
जेसीबीने खड्डा खोदताना सहाजणांना रंगेहात पकडले
Published on
Updated on

अकोले : राजूर शहरातील भरवस्तीत जुन्या पडक्या इमारतीतमध्ये व मोकळ्या जागेत सोन्याची पेटी, धन काढण्यासाठी जडुबुटीचा वापर करत जादुटोना सुरु होता. तसेच जेसीबी मशिनने खड्डा खोदने सुरु होते त्‍याचवेळी पोलिसांनी सहाजणांना रंगेहात पकडले. याप्रकरणी गिरीश विनायक बो-हाडे सह सहा जणांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोना प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान घटनास्थंळी सोन्याची पेटी काढण्यासाठी जडुबुटी आणुन जादुटोना करणाऱ्यां काही जणांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने पोलिसांच्या कामगिरीबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे.

जेसीबीने खड्डा खोदताना सहाजणांना रंगेहात पकडले
kurundwad Black Magic Incident | कुरुंदवाडमध्ये पुन्हा भानामतीचा प्रकार

याबाबत राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत, राजुर शहरामध्ये वंदना कलेक्शन समोर गिरीश विनायक बो-हाडे यांचे जुन्या पडक्या घरामध्ये चार लोक व एक महीला बसलेली असून ते काहीतरी विधी करत आहेत अशी खात्रीशिर बातमी मिळाली. पोलिसांनी दोन पंचाना बोलावुन घटनास्थळी धाव घेतली. घरासमोर मोकळ्या जागेत जे.सी.बी. मशीन चालु होते व त्याचे समोर गिरीश बो-हाडे व काहीजण होते, त्यावेळी पोलिसांनी विचारणा करताच, आम्ही सदरचा खड्डा हा पाण्याची टाकी बांधण्यासाठी करत आहोत अशी बतावणी त्‍यांनी केली

जेसीबीने खड्डा खोदताना सहाजणांना रंगेहात पकडले
Nagar Municipal Election Reservation: नगर महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण; इच्छुकांची घालमेल वाढली

पोलिसांनी पाहणी केल्यावर घटनास्थळी तेथे चार इसम व एक महीला बसलेली होती व त्यांचे समोर जादू टोना करण्यासाठी लागणारे साहीत्य पडलेले दिसले त्यात लिंबु, हळद, कुंकु, अगरबत्ती, गुलाब पाणी, काडीची पेंटी व इतर वस्तु आढळून आल्या. तसेच शेजारील खोलीत एक खड्डा घेतलेला व त्याचे अवतीभोवती खड्डयातील माती व माती उकरण्यासाठी लागणारे साहीत्य पडलेले होते.

त्यावेळी सादीक बेग जाफर बेग वय ३५ रा. काजी प्लॉट हनफिया मस्जीद ता. कामरगाव जि. वाशिम, अनिकेत सुरेंद्र काळपांडे वय ३१ रा. नरेंद्र मोटार गॅरेज, मोशी रोड, शिक्षक बँक जवळ, राधानगर, शिवाजीनगर अमरावती, निलेश सुरेशराव रेवास्कर वय ३७ रा. राठीनगर, कामरगाव ता. कामरगाव जि. वाशिम, विष्णु पाराजी हाजारे वय ७४ रा. अशोक मार्ग, अक्षरधाम रो हौस, नं. ५ अशोक टावर जवळ नाशिक, द्वारका कॉर्नर ता. जि. नाशिक यांना पकडण्यात आले.

याबाबत अधिक चौकशी केली असता न सदर जागेत एक सोन्याची पेटी असल्याचे आम्हाला आमचेकडील तांत्रीक मंत्राव्दारे समजले होते. त्याबाबत आम्ही गिरीश विनायक बो-हाडे यांना सांगितले होते. असे ताब्यात घेतलेल्यांनी सांगितले. सदर पेटीवर साप व इतर काही दृष्ट शक्ती असते त्याचे पासुन आपला बचाव करण्यासाठी आपल्याला विधी मार्ग करावा लागेल त्यासाठी आम्हाला ज्या जडी बुटी आणव्या लागतील त्याचा खर्च १० हजार रुपये लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news