Ayurveda | भारतीय संस्कृतीमध्ये योग, आयुर्वेदाला महत्त्व !

महंत रामगिरी महाराज; श्रीरामपुरात स्व. बाळासाहेब ठाकरे योगभवनाचे लोकार्पण
Ayurveda
योग दिन विशेष File Photo
Published on
Updated on

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा

भारतीय संस्कृतीमध्ये योग व आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योग हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे, माजी खा. सदाशिव लोखंडेंनी योग भवनासाठी निधी दिल्याने खऱ्याअथनि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य योगाच्या माध्यमातून होईल, असे प्रतिपादन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.

शहरातील बोंबले नगर येथे माजी खासदार सदाशिव यांच्या प्रयत्नाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे ८० लक्ष रुपयांच्या श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या स्व. बाळासाहेब ठाकरे योग भवनाचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खा. सदाशिव लोखंडे, खेमानंद फाउंडेशनचे सचिव प्रशांत लोखंडे, चैतन्य योगा ग्रुपचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी,

भाजपचे ओबीसी सेलचे सरचिटणीस प्रकाश चित्ते, शिवसेनेचे कमलाकर कोते, दादासाहेब कोकणे, विराज भोसले, आर्ट ऑफ लिविंग च्या प्रशिक्षक सुजाता शेडगे, नगरसेवक दीपक चव्हाण, नगरसेविका आशा रासकर, वैशाली चव्हाण, प्रियंका लोखंडे, नंदाताई लोखंडे, शिवसेनेचे नेते अरुण पाटील, नारायण डावखर आदी उपस्थित होते. रामगिरी महाराज म्हणाले, योग फक्त व्यायामाचे साधन नाही, शरीराच्या विश्रांतीसाठी लोक मोठे बंगले बांधतात, मात्र त्या ठिकाणी त्यांना समाधान मिळत नाही.

समाधान मिळण्यासाठी जीवनातील एक तास योगाभ्यास करावा, त्यासाठी मनाला ज्ञानाचा अंकुश पाहिजे, असे सांगून योग साधनेच्या बळावर चांगदेव महाराज चौदाशे वर्ष जगले. गंगागिरी महाराज पण योगी होते, योगसाधना केल्यानंतर समाजप्रबोधनही त्यांनी केले आहे. निरोगी शरीरासाठी योग खूप गरजेचा आहे, असेही ते म्हणाले.

प्रकाश चित्ते म्हणाले, हिंदू धर्म समृद्ध जीवनपद्धती आहे. योगाशिवाय हिंदू धर्म पूर्ण होत नाही, धर्म सांगण्याचे काम रामगिरी महाराजांनी सुरू केले आहे त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले काम आहे. अनिल कुलकर्णी म्हणाले, लोखंडे यांनी आमची ३६ वर्षाची साधना विचारात घेऊन योगभवनासाठी निधी देऊन उत्कृष्ट प्रकारचे योग भवन उभारले यामुळे आमची साधना फळाला आली. माजी. खा. सदाशिव लोखंडे म्हणाले, योग भवनासाठी शिवसेनेचे नेते अशोक थोरे, अनिल कुलकर्णी आदी नागरिकांनी माझी भेट घेत मला दहा लाख रुपये निधी मागितला होता.

मी त्यावर निर्णय घेऊन शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नगर नगरपरिषद हद्दीतील आठ पालिकांना निधी दिला. पालिकेने फक्त जागा द्यायची, यामध्ये राहाता नगर परिषदेने जागा दिली नाही म्हणून त्या ठिकाणी योग भवन झाले नाही नाहीतर अन्य सात ठिकाणी सुमारे ८० लाख रुपयांचे एक असे योग भवन उभे केले आहे. श्रीरामपूरच्या जनतेने मला १७ दिवसांमध्ये खासदार केले, लोकप्रतिनिधींनी निवडणुकीनंतर जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम केले पाहिजे.

पाच वर्षापासून प्रशांत लोखंडे हे उंबरगाव येथे राहत असून महा किसान संघाचे ते अतिशय चांगले काम करत आहे. त्यांच्यामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना ते राबवत आहेत. कांद्याला चांगला बाजार भाव ते कांदा खरेदी करून देणार आहेत असे सांगून भविष्यात प्रशांत लोखंडे हे येथील सर्वच बाबतीत लक्ष घालणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे नेते अशोक थोरे, राजेंद्र देवकर आदींनी आपली मनोगत व्यक्त केली.

यावेळी मनसुख चोरडिया, भैरवनाथ नगरच्या लोकनियुक्त बिनविरोध सरपंच दिपालीताई फरगडे, मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण फरगडे, भागवत लासुरे, बबनराव मुठे, बहिरट महाराज, श्रीनिवास बिहानी, रणजीत श्रीगोड, गोरक्षनाथ बारहाते, मधु महाराज, शिवसेना शहर प्रमुख उमेश पवार, अभिजीत राका, प्रशांत शहाणे, विजय लांडे, संतोष डहाळे, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम वाघ, तालुकाप्रमुख प्रदीप वाघ, रवी जाधव, संजीव शिंदे, राजेंद्र ओहोळ, सुरेश आसने, भगवान कुंकलोळ,

रोहन डावखर, प्रवीण बॉबले आदि उपस्थित होते. प्रास्ताविकात खेमानंद फाउंडेशनचे सचिव प्रशांत लोखंडे म्हणाले, योग आणि आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. योग हे शरीर सुधारण्याचे साधन नसून त्या माध्यमातून निरोगी आयुष्य जगता येऊ शकते तसेच रोजगारही मिळू शकतो त्यामुळे योगाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन निवेदक प्रसन्न धुमाळ, तर आभार प्रदर्शन प्रदीप वाघ यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news