पारनेर : पारनेर शहरात जादूटोणा करणाऱ्या महिलेने सांगितलेले उतारे टाकण्यास व सरबत पिण्यास नकार दिल्याने सुनेला मानसिक त्रास देऊन तिला मारहाण करणाऱ्या सुशिक्षित कुटुंबातील पती, सासू आणि ननंदेसह देवलशी महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पारनेर शहरात राहणाऱ्या शुभांगी साईनाथ औटी वय 25 यांना पती साईनाथ औटी, सासू सुवर्णा औटी, ननंद भाग्यश्री औटी यांनी कळमकरवाडी घारगाव ता. श्रीगोंदा येथील देवलशी महिला उषा कळमकर हिच्याकडे सासूचा जमा बरा होत नाही, घराला भाडेकरू येत नाही व ननंद भाग्यश्री चे लग्न जमत नाही.
यासाठी तिने सांगितलेला विधी होम हवन व उतारे टाकण्यास व तिने बनवून दिलेले सरबत पिण्यास नकार दिल्याने तसेच तिने सांगितल्यानुसार देवीचे वारे अंगात घेण्यास नकार दिल्याने पत्नी सासू ननंद यांनी शिवीगाळ करून मारहाण केली व घराबाहेर काढले. तसेच गळ्यातील सोन्याचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र हातातील अंगठ्या इसकावून घेतल्या व मारहाण केली तिला हा त्रास देवलशी उषा कळमकर हिच्या सांगण्यावरून पती साईनाथ औटी व सुवर्ण औटी भाग्यश्री औटी यांनी दिला असून त्यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात सून शुभांगी औटी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम एस बगाड करत आहेत.
हेही वाचा