जुनपासून ‘मिशन आरंभ’ला पुन्हा गती!

जुनपासून ‘मिशन आरंभ’ला पुन्हा गती!

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिष्यवृत्ती 2025 ची जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जात आहे. एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या सराव चाचणीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यात पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, नव्या शैक्षणिक वर्षात जुनच्या चौथ्या शनिवारी नियोजनाप्रमाणे सराव चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडून फेब्रुवारी 2025 मध्ये होणार्‍या शिष्यवृत्ती परीक्षेची विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली जात आहे. 27 मार्चच्या सभेत येरेकर यांनी सराव चाचण्याच्या घेण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच 'मिशन आरंभ' परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आलेल्या पाचवीच्या 500 आणि आठवीच्या 500 अशा एक हजार विद्याथ्यार्ंसाठी 1 एप्रिलपासून ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

तालुकास्तरावरील तज्ज्ञ शिक्षक दररोज एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या सराव चाचण्यांचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात मे महिन्यात पाचवीचा पहिला पेपरला 76.18, दुसर्‍या पेपरला 75.58 आणि आठवीचा पहिला पेपर 64.71 आणि दुसरा पेपर 62.07 टक्के निकाल लागला आहे.

नव्या शैक्षणिक वर्षात जिल्हास्तरावरून दरमहा चौथ्या शनिवारी पाचवी आणि आठवीची; तर तालुकास्तरावरून तिसरी, चौथी, सहावी, सातवीची तिमाही सराव परीक्षा घेतली जाणार आहे. 29 जुनरोजी या परीक्षा घेतल्या जातील.

– भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news