Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या तपासासाठी दिल्ली पोलिस पाथर्डीत

डॉ. खेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली होती
Dr. Khedkar inquired about the nomination papers
पूजा खेडकर File Photo
Published on
Updated on

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संदर्भातील कागदपत्रांची माहिती घेण्यासाठी आज (मंगळवारी)दिल्ली पोलिसांचे दोन जणांचे पथक येथील तहसील कार्यालयात दाखल झाले. या पथकाने स्थानिक प्रशासनाकडून पूजा खेडकर यांच्या आई व भालगावच्या माजी लोकनियुक्त सरपंच डॉ. मनोरमा खेडकर यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवताना जे नामनिर्देशनपत्र तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत दाखल केले होते, ते आपल्या ताब्यात घेतले. हे पथक खेडकर यांचे गाव असलेल्या भालगाव येथेसुद्धा जाईल असे वाटत होते; मात्र भालगावला न जाता या पथकाने तहसील कार्यालयातच डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशनपत्र दाखल केले होते त्याची माहिती घेतली.

डॉ. खेडकर यांनी मागील वेळेस झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी केली होती मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर त्यानंतर झालेल्या भालगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच निवडणुकीत त्या उभ्या राहिल्या व बहुमताने निवडूनसुद्धा आल्या होत्या; मात्र त्यानंतर पुन्हा एकदा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

या निवडणुकीत डॉ. खेडकर यांनी जे नामनिर्देशनपत्र दाखल केले होते व त्याच्यासोबत जी कागदपत्रे निवडणूक शाखेत दाखल केली होती, त्या सर्व कागदपत्रांची आज दिल्लीच्या पथकाने छाननी केली व कागदपत्रांच्या प्रती सोबत नेल्या. यासंदर्भात या पथकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news