

अहिल्यानगर : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट छावा मराठी भाषेमध्ये येणार आहे. मंत्री उदय सामंत यांच्या मागणीला छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उत्तेकर यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे.
छावा चित्रपट प्रदर्शीत झाल्यानंतर कालच मी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक उत्तेकर यांच्याशी माझी भेट झाली. मी मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांना विनंती केली की, छावा चित्रपट मराठीमध्ये डब करून आणावा. त्याला जे काही सहकार्य लागेल ते महाराष्ट्र सरकार करायला तयार आहे. उत्तेकर यांनी माझी मागणी तत्वतः मान्य केली आहे. येत्या दोन दिवसात विकी कौशल, निर्माता, उत्तेकर आम्ही एकत्र भेटणार आहोत. छावा मराठीमध्ये आला तर मराठी मुलांना देखील चांगल्या पद्धतीने तो बघता येईल, असे सामंत म्हणाले.