

Ahilyanagar News - नेवासा तालुक्यातील अहिल्यानगर - संभाजीनगर हायवेवरील खडका टोल नाका येथे बुधवारी पहाटे ५ सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खाजगी बसचे टायर फुटल्याने बसला आग लागली आहे. बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.
पोलीस घटनास्थळी पोचले आहेत. बसमधील सर्व प्रवासी खाली उतरवले आहेत. अग्निशमनला बोलावलं असून वाहतूक सुरळीत चालू केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
ही खाजगी प्रवाशी बस साईराम ट्रव्हल्सची होती. बसमध्ये १५ प्रवासी पुणे ते जामोद असा प्रवास करीत होते. आगीच्या घटनेची माहिती मिळताच भेंडा येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखन्याचा अग्निशमन बंब घटना स्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर अली आहे.