मनोज जरांगे समर्थकांकडून अजय बारस्कर यांना मारहाण

घरामध्ये घुसून आईसह शेजाऱ्यांनाही मारहाण
Ahmednagar News
मनोज जरांगे समर्थकांकडून अजय बारस्कर यांना मारहाणPudhari Photo
Published on
Updated on

नगर : बोल्हेगाव येथील अजय महाराज बारस्कर यांना गुरूवारी (दि.17) रात्री घरात घुसून मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे समर्थक तरुणांनी शिवीगाळ आणि मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ बारस्कर महाराज यांच्या घरी जाऊन मारहाण करणार्‍यांना ताब्यात घेतले आहे. याबद्दल रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोपीचंद सुनील आरडे (रा. बोल्हेगाव, ता. नगर), साजिद अब्दुल लतिफ लाला शेख (रा. नागापूर, बोल्हेगाव, ता. नगर) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत अजय महाराज बारस्कर यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

Ahmednagar News
Nashik | समाेरासमोर येताच जरांगे समर्थक आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा

अजय बारस्कर यांचे बोल्हेगाव फाटा येथे घर आहे. गुरूवारी रात्री आठ वाजता मनोज जरांगे समर्थक दोघे घरी आले तेव्हा आई घरी होती. ते आईला म्हणाले, कुठे आहे बारस्कर महाराज त्याला बोलवा. त्यावेळी त्यांनी आईलाही मारहाण केली. तर, शेजारी राहणारे काका तिथे आला असता त्यांनाही लोखंडी पाईपने मारहाण केली. तेव्हा बावस्कर हे घराजवळ असणार्‍या कार्यालयात होते. घरून फोन आल्यानंतर तत्काळ ते घरी गेले यावेळी गोपीचंद आरडे, साजिद शेख दोघे दारूच्या नशेत शिवीगाळ करीत होते. त्यांना काय झाले असे विचारले असता त्यांनी तुम्ही मनोज जरांगे विरोधात बोलला होता. तुम्हाला मारू टाकू असे म्हणून त्यांनी हातातील लोखंडी पाईपने मारहाण करून धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांच्या पायाला दुखापत झाली. यानंतर ते दाघे बावस्कर यांच्या दारामध्ये बसून आम्ही कट्टर जरांगे समर्थक असून, तुम्हाला मारू टाकू अशी धमकी देत शिवीगाळ करीत होते. दरम्यान, पोलिसांना माहिती दिल्यानंतर एमआयडीसी सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना त्यांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Ahmednagar News
गेवराई : मनोज जरांगे समर्थक अमोल खुणे यांच्यावर जीवघेणा हल्ला
आई घरी असताना मनोज जरांगे समर्थ दोन तरुण आले. पाटलांच्या विरोधात का बोलता म्हणून त्यांनी माझ्यासह कुटुंबियांना शिवीगाळ करून मारहाण केली.
- अजय बारस्कर महाराज

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news