नगर : ३१ डिसेंबरला साई मंदिर बंद राहणार – सीईओ भाग्‍यश्री बानायत | पुढारी

नगर : ३१ डिसेंबरला साई मंदिर बंद राहणार - सीईओ भाग्‍यश्री बानायत

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाच्‍या दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजीच्‍या कोवीड-१९ संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार दिनांक २५ डिसेंबर २०२१ रोजीपासून रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत साई मंदीर बंद राहणार असल्याची माहिती सीईओ भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

सध्या देशात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्‍हेरियंटचा वाढता धोका लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्‍या आहेत. त्‍यानुसार दिनांक २५ डिसेंबर पासून रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. तसेच राज्‍य शासनाचा पुढील आदेश प्राप्‍त होईपर्यंत, श्री साईबाबा समाधी मंदिरातील रात्री १०.३० व पहाटेची ०४.३० च्या आरतीवेळी भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

श्रींच्‍या दर्शनासाठी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंतच भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व साईभक्‍तांनी कोरोनाचे नियम पाळत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हेही वाचा

Back to top button