नगर : विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवताना पाच जणांचा बुडून मृत्यू; वाकडी गावातील मोठी दुर्घटना

नगर : विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवताना पाच जणांचा बुडून मृत्यू; वाकडी गावातील मोठी दुर्घटना
Published on
Updated on

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : ऐन गुढीपाडवा सणाच्या दिवशीच तालुक्यातील वाकडी गावात शेण जमवलेल्या जुनाट विहिरीतील शोष खड्डा गाळामध्ये पडलेली मांजर काढण्यासाठी केलेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना एका मागे एक काळे कुटुंबीयातील पाच जण विहिरीतील गॅस मुळे बेशुद्ध पडून गाळात गुंतून पाच जण ठार झाले तर एकाला वाचवण्यात यश मिळाले. वाकडी गाव शोकमग्न झाले आहे.

 माणिक गोविंद काळे (वय ६५ वर्षे), संदीप माणिक काळे (वय ३६ वर्षे), बबलू उर्फ विशाल अनिल काळे (वय २८ वर्षे), अनिल बापूराव काळे (वय ५३ वर्षे), बाबासाहेब गायकवाड (वय ३६ वर्षे) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. तर विजय माणिक काळे (वय ३६) हे जखमी आहेत.

नेवासा तालुक्यातील वाकडी शिवारातील अनिल बापूराव काळे यांच्या शेतावर असलेल्या शेणाचं गाळ जुन्या विहिरीत साठवलेला आहे. या विहिरीमध्ये मांजर पडल्यानंतर मांजर काढायला विशाल उर्फ बबलू अनिल काळे (वय २३)हा गेला. हे लक्षात आल्यावर त्याचे वडील अनिल बापूराव काळे ५८विहिरीत उतरले व वर आलेच नाही आणि हे पाहून शेजारच्याच शेतातील कामगडी बाबासाहेब गायकवाड हा त्यांना काढायला खाली गेला तो सुद्धा आत मध्येच गेला दरम्यान अनिल चे बंधू चुलत भाऊ संदीप माणिक आणि काळे३६ हे रस्त्याने जात होते त्यांना आवाज दिल्यानंतर ते देखील विहिरीत उतरले आणि वर आलेच नाहीत हे पाहून त्यांचा वडील माणिकराव गोविंदराव काळे, गोविंदराव काळे ६५त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरले आणि तो देखील बेशुद्ध होऊन त्या गाळातच रुतले दरम्यान विजय माणिक काळे ३६ हा कमरेला दोर लावून विहिरीत उतरला लागल्यावर त्याने आवाज देतात लोकांनी त्याला वर काढला आणि त्याला नेवासा फाटावरील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे.

नेवाशापासून पंचवीस किलोमीटर आंतर असलेल्या वाकडी शिवारामध्ये ही घटना चार च्या दरम्यान घडली. घटना समजतात तहसीलदार डॉ संजय बिरादार व पोलीस निरीक्षक धनंजय जाधव आपल्या कर्मचाऱ्यांचे हजर झाले येथील महिला पोलीस पाटील अँड. अंजली काळे या उपस्थित झाल्या. अहमदनगर, श्रीरामपूर व औरंगाबाद येथील आपत्ती व्यवस्थापन पथक बोलवण्यात आल्यानंतर रात्री आठ पर्यंत या टीम पोहोचल्यानंतर गावातील पाच प्रेते बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता. घटनास्थळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे ठाण मांडून होते.

दरम्यान काळे कुटुंबात अजय माणिक काळे हा एकमेव पुरुष जिवंत आहे सध्या तो शेतीच करतो गुढीपाडव्याच्या मुहूर्त वाकडी गावात झालेल्या भीषण घटनेमुळे परिसरात शोककुल वातावरण आहे सुदैवाने वाचवले वाचलेला विजय काळे हा प्रथम नेवासा फाटा येथे व नंतर अहमदनगर येथील खाजगी रुग्णालय त दाखल करण्यात आला आहे

गाई म्हशींचे गोमूत्र व शेण साठवण्यात आलेल्या विहिरीमध्ये शोष खड्डा बनवण्यात आला होता त्यामुळे या विहिरीमध्ये विषारी वायू तयार झालेला होता विहिरीमध्ये प्रत्येक जण उतरलेला प्रथम बेशुद्ध पडून नंतर त्या गाळात रुतून निधन पावला. पाच जण मधील मयत माणिकराव काळे हे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले होते. – सरपंच संभाजी रामदास काळे पाटील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news