काँक्रिटचे बाकडे अंगावर पडून तीन चिमुकले जखमी..!

काँक्रिटचे बाकडे अंगावर पडून तीन चिमुकले जखमी..!
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरातील लक्ष्मीनगर प्रभागातील ग्रामीण रुग्णालय परिसरात खेळताना जीर्ण झालेले सिमेंट काँक्रिटचे बाकडे अंगावर पडल्याने तीन चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, रिजवान रशीद सय्यद (वय 10 वर्ष), वाहिद रशीद सय्यद (वय 7 वर्ष), मुस्कान (वय 4 वर्ष) अशी जखमी झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. घटनेनंतर मुलांवर तातडीने उपचार सुरू आहेत, असे वैद्यकीय अधिकारी गिरीश गुट्टे यांनी सांगितले. या चिमुकल्यांची आई आजारी असल्याने त्या ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत होत्या.

यावेळी तीनही चिमुकले त्यांच्या जवळच होते. ग्रामीण रुग्णालयात येणार्‍या रुग्णांसाठी व नागरिकांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्याजवळ हे तिघे खेळत होते. बाकडे अंगावर पडून वरील तिघेही बालके जखमी झाले. घटना घडल्यानंतर तेथे असलेल्या रुग्णालय कर्मचारी व नागरिकांनी त्या चिमुकल्यांना रुग्णालयात नेले, डॉ. संजय उंबरकर यांनी उपचार केले. वैद्यकीय अधीक्षक गिरीश गुट्टे यांनी मुलांची तब्येत चांगली असल्याचे सांगितले.

कोट्यवधीचा निधी येतो, मग जातो कुठे?

कोट्यवधीचा निधी येतो, मग तो जातो कुठे, असा सवाल करीत पुन्हा अशा दुर्दैवी घटना घडू नये यासाठी जीर्ण झालेले सिमेंट काँक्रिटचे बाकडे हटविण्याची मागणी करतानाच जखमी चिमुकल्यांवर तत्काळ उपचार केले नसल्याचा आरोप माजी नगरसेवक मेहमूद सय्यद यांनी केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news