आता मिशन सीना सुशोभीकरण; आमदार संग्राम जगताप

आता मिशन सीना सुशोभीकरण; आमदार संग्राम जगताप

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील उपनगरातील 21 रस्त्यांसाठी 150 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. याशिवाय पाच कोटींच्या निधीतून सावेडी बसस्थानकही लवकरच कात टाकणार आहे, तर सीना नदीच्या सुशोभीकरणासाठीही 7 कोटींचा निधी प्राप्त झाला असून, आजच कार्यारंभ आदेश झाल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. नगर शहरात पत्रकारांशी बोलताना आमदार जगताप म्हणाले, नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने शहरातील रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज 1 ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील 150 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. आठ दिवसांत या कामांची निविदा प्रक्रिया सुरु होणार आहे. महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोत्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे.

यापूर्वी नगर शहरातील कोठी रोड, बालिकाश्रम रोड, टिळक रोड, स्वस्तिक चौक ते आनंदऋषीजी महाराज समाधीस्थळ रस्ता, छ. शिवाजी महाराज चौक ते शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर मिरवणूक मार्ग रस्ता, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, केडगाव देवी रस्ता, केडगाव लिंक रोड, पुणे महामार्ग ते कल्याण महामार्गापर्यंत, केडगाव अर्चना हॉटेल ते नेप्ती बाजार समिती रस्ता, महेश टॉकीज रस्ता, तारकपूर ते राधाबाई काळे महिला कॉलेज, सराफ बाजार रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून शहरात टप्य्याटप्प्याने डीपी रस्त्याची कामे मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिका हद्दीतील डीपी रस्त्यांसाठी महापालिकेने प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन दरबारी पाठपुरावा केला. नगर शहरातील डीपी रस्ते प्राधान्यक्रमाने होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने मंत्रालय पातळीवर कायम संपर्कात राहून नगर शहरातील भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण कामाची मुहूर्तमेढ रोवली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य लाभले.

शहरातील रस्ते व मिळालेला निधी

  • माऊली संकुल ते गंगा उद्यान ते छत्रपती संभाजीनगर रोड, कलेक्टर ऑफिसपर्यंत रस्ता रुंदीकरण – 15 कोटी रुपये.
  • सर्व मंगल कार्यालय मनोज साठे यांचे घर ते भिंगारवाला रस्ता रुंदीकरण – 3 कोटी 66 लाख रुपये.
  • केडगाव लिंक रोड ते जे एल पी रेसिडेन्सी ते पुणे रोडपर्यंत रस्ता – 6 कोटी रुपये.
  • झिंजुर्डे यांचे घर ते ज्येष्ठ नागरिक भवन ते सीना नदीपर्यंत रस्ता – 12 कोटी 34 लाख रुपये.
  • सावेडी अष्टविनायक अपार्टमेंट ते टेलीफोन ऑफिस ते पारिजात चौक ते एकवीरा चौक ते सिटी प्राईड हॉटेल ते तपोवन रोड बालाजी
  • कॉलनी नाला राजनंदनी हॉटेल सोडून रस्ता – 7 कोटी 68 लाख रुपये.
  • मुकुंदनगर सीआयव्ही कॉलनी रस्ता रुंदीकरण – 5 कोटी 16 लाख रुपये.
  • भिंगार नाला विकास, मनपा हद्दीतील कामे – 16 कोटी 44 लाख रुपये.
  • भवानीनगर इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय ते औसरकार मळा ते साळुंखे मळा, बुरूडगाव रोड – सुमारे 13 कोटी 50 लाख रुपये.
  • बुरूडगाव रोड नक्षत्र लॉन ते वाकोडी रोड या रस्त्याला जोडणारा रस्ता, सीए भवन ते वाकोडी रोड समर्थनगर रस्ता- 2 कोटी 40 लाख रुपये.
  • माळीवाडा वेस ते पंचपीर चावडी ते माणिक चौक, भिंगारवाला चौक ते सर्जेपुरा चौक ते पेशवाई शॉप रस्ता – 10 कोटी 67 लाख रुपये
  • पत्रकार चौक ते अप्पू हत्ती चौक, लाल टाकी ते न्यू आर्ट्स कॉलेज रस्ता – 15 कोटी 74 लक्ष रुपये.
  • नगर वाचनालय ते गांधी मैदान आनंदी बाजार ते गाडगीळ पटांगण ते अमरधाम रोड – 5 कोटी 40 लाख रुपये.
  • बोल्हेगावमध्ये सुरेश वाडमोडे घर ते आढाव घर ते विलास वाटमोडे दुकान ते समृद्धी पार्क पर्यंतचा रस्ता – 4 कोटी 91 लक्ष रुपये.
  • दिल्ली गेट ते बागरोजा हडको चौक ते नेप्ती नाका चौक – 4 कोटी 5 लाख रुपये.
  • जीपीए चौक, धरती चौक ते मार्केट यार्ड चौक, कल्याण रोड ते डेअरी रोडपर्यंत रस्ता; काजी वकील ते कल्याण रोड वगळून – 6 कोटी 39 लाख रुपये.
  • गोविंदपुरा नाका ते गोविंदपुरा पोलीस चौकीपर्यंत रस्ता – 2 कोटी 58 लाख रुपये
  • – तपोवन रोड ज्ञानेश्वरी ब्यूटी पार्लर ते राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनपर्यंत रस्ता – 3 कोटी 23 लाख रुपये
  • श्यामसुंदर पॅलेस ते हिवाळे घर ते तवले वाडा हिंमतनगरपर्यंत रस्ता – सुमारे 3 कोटी 11 लाख रुपये मंजूर, सारसनगर बाळू इकडे
  • पिठाची गिरणी ते साईनगर ते छत्रपतीनगरपर्यंत रस्ता – 2 कोटी 38 लाख रुपये.
  • यशोदानगर जरीवाला बिल्डिंग ते चंचल निवास स्नेहल ट्रेडर्स ते सपकाळ हॉस्पिटल ते किंग कॉर्नरपर्यंत रस्ता – 3 कोटी 43 लाख रुपये.
  • प्रोफेसर कॉलनी चिन्मय शॉप ते अवतार मिनी मार्केट ते संत निरंकारी भवन ते गंगा उद्यानपर्यंत रस्ता – 5 कोटी 99 लाख रुपये.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news