Crime News : भरदिवसा घर फोडून दीड लाखाची रोकडलंपास | पुढारी

Crime News : भरदिवसा घर फोडून दीड लाखाची रोकडलंपास

राशीन : पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन- भिगवण रस्त्यावर पाण्याच्या टाकी समोर आढाव कॉलनीमध्ये दुपारी 3 वाजता घरफोडी करून चोरट्यांनी दीड लाखाची रोकड व काही ऐवज लंपास केला. शनिवारी (दि. 17) दुपारी तीनच्या सुमारास राशीन- भिगवण रस्त्यावर पाण्याच्या टाकीसमोर आढाव कॉलनीत शफिक पिंजारी व नूरजहाँ पिंजारी यांच्या बंगल्याचा सेफ्टी दरवाजा चोरट्यांनी ी कटावणीने तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड व दोन जोड चांदीचे पैंजण चोरून नेले. पिंजारी यांनी बांगड्याच्या व्यवसायासाठी व मेहुणींच्या लग्नासाठी ही रोकड घरात आणून ठेवली होती. चोरटे घरात घुसल्याची चाहूल शेजार्‍यांना लागताच पिंजारी यांच्या बंगल्यासमोर उभा राहिले.

परंतू चोरट्यांनी बंगल्याच्या स्लॅबवरून उडी मारून पळ काढला. चोरट्यांनी बंगल्याशेजारी लावलेली दुचाकी जामावामुळे नेता आली. मात्र ही दुचाकी चोरट्यांची की अन्य कोणाची हे अद्यापि स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारुती मुळूक, उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी तात्काळ घटनास्थळात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी राशीन पोलिस ठाण्याची चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राशीन परिसरात मागील आठवड्यापासून चोर्‍यांचे सत्र सुरू असून, जगदंबा हाऊसिंग सोसायटीमध्ये एकाच रात्रीत तीन घरफोड्या झाल्या. यासंदर्भात काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान तयार केले आहे.

हेही वाचा

Back to top button