बसस्थानक व्यापारी संकुलाची 14 कोटींच्या कामाची निविदा | पुढारी

बसस्थानक व्यापारी संकुलाची 14 कोटींच्या कामाची निविदा

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : आ. आशुतोष काळे यांनी शहरवासियांना विकसित कोपरगावचे स्वप्न दाखविले. यादृष्टीने आणखी एक पाऊल पुढे टाकून, बस स्थानक परिसरात लवकरच व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, व्यापारी संकुलाच्या 14 कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले. विकसित कोपरगावचे स्वप्न सत्यात उतरवित पाणी प्रश्न, शहर विकासासह बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. बेरोजगार युवक व गरजूंना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु आहे. 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी मागणी केली होती.

तत्पूर्वी तत्कालीन परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले होते. पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार एप्रिल 2022 मध्ये कोपरगाव पंचायत समितीच्या प्रांगणात कर्मवीर काळे यांच्या पुतळ्याचे अनावरण व विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पणप्रसंगी त्यांनी बस स्थानक व्यापारी संकुलास मंजुरी दिली होती. व्यापारी संकुलासाठी निधी मिळावा, यासाठी आ. काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. अखेर परिवहनने 14 कोटी रुपये निधी मंजूर केला. संकुलामुळे सोयी-सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

इलेक्ट्रिक कामाची स्वतंत्र निविदा लवकरच..!

व्यापारी संकुलाच्या 10 कोटीच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. उर्वरित इलेक्ट्रिक कामाची स्वतंत्र निविदा लवकरच प्रसिद्ध होईल. एकूण 14 कोटीचा निधी व्यापारी संकुलास मिळणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

Back to top button