कपड्यावरील डाग पुसता येतो पण सरकारवरील डाग कसा पुसणार : भास्कर जाधव | पुढारी

कपड्यावरील डाग पुसता येतो पण सरकारवरील डाग कसा पुसणार : भास्कर जाधव

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : कपड्यावरील डाग साबणाने, किंवा वॉशिंग पावडरने धुता येतो मात्र सरकार वर पडलेला डाग कोणत्या साबणानेकसा पुसणार असा प्रतिसावाल करत उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव निमित्ताने उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते व माजी मंत्री आमदार भास्कर जाधव संगमनेररात आले होते त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधीनी मुंबईत सुरू केलेली डिप क्लिनिंग ड्राइव्ह अर्थात संपूर्ण स्वच्छता मोहीम संपूर्ण राज्यात राबवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्या घोषणे बाबत आ.भास्कर जाधव यांना छेडले असता ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या चारित्र्यावर व निष्ठेवरच डाग पडलेला असून महाराष्ट्राची वैचारिक परंपरा बरबाद केल्याचा डाग कसा पुसणार अशा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला

भावना गवळी यांची बँक खाती गोठव ल्याबद्दल आ.भास्कर जाधव यांना माध्य मांच्या प्रतिनिधींनी विचारले असता ते म्हणाले की आपल्या एका खूप मोठ्या भावाला राखी बांधली होती, कदाचित त्या मोठ्या भावानेच खासदार भावना गवळी यांना भाऊबीज भेट दिली असेल अशी टीका शिवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव न घेता केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार तोच मुद्दा उपस्थित करत आहे.त्यामुळे त्यांच्या कडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही. त्यांच्या वाढत्या वयात काम करण्याच्या वृत्तीचा आदर्श इतरांनी घ्यावा . अजून तरी त्यांचा स्टॅमिना आणि फिरण्याची धमक उत्साह हा एखाद्या वीस वर्षाच्या तरुणाला लाजविणारा आहे. त्यामुळे उगाचंच त्यांच्या वयाच्या विषयावरून वारंवार उच्चार करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले कार्यकर्तुत्व त्या आड लपवू नकाअसा टोला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला

Back to top button