जिल्ह्यात 27 सप्टेंबरपर्यंत जवळपास 71 टक्के म्हणजे 5 लाख 29 हजार 905 हेक्टर क्षेत्रावरील ई-पीक नोंदणी झाली आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 87 तर शेवगाव तालुक्यात सर्वात कमी 56.19 टक्के नोंदणी झाली. शासनाने ‘माझी शेती माझा सातबारा, ‘मीच नोंदवणार, माझा पीक पेरा’च्या उद्देशाने स्वतः च्या शेताची पीक पाहणी स्वतः करण्याची संधी ई पीक पाहणी अॅपद्वारे शेतकर्यांना उपलब्ध करून दिली आहे. पीक विमा, नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे तसेच भूसंपादन आदींसाठी ई-पीक पाहणी अॅपद्वारे शेतकर्यांनी पीक पाहणी नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे.
2024-25 या वर्षातील खरीप हंगामाच्या नोंदणीसाठी 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यत मुदत होती. जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र 7 लाख 46 हजार 327 हेक्टर आहे. शासनाने शेतकरी स्तरावरील या नोंदणीस 23 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. जिल्ह्यात 23 सप्टेंबरपर्यत 4 लाख 99 हजार 474 हेक्टर नोंद झाली. 24 सप्टेंबरपासून शेतकरी आता तलाठीस्तरावर नोंदणी करीत आहेत. त्यामुळे 27 सप्टेंबरपर्यंत ही नोंदणी 5 लाख 29 हजार हेक्टरवर गेली आहे.
27 सप्टेंबरपर्यंत नेवासा तालुक्यात 62.24 टक्के, श्रीरामपूर तालुक्यात 65.38 टक्के, राहाता तालुक्यात 66.42, श्रीगोंदा तालुक्यात 77.43, पाथर्डी तालुक्यात 81.49 टक्के, नगर तालुक्यात 73.58, पारनेर 87.09 टक्के, शेवगाव 56.19, कर्जत 76.10, जामखेड 60.94, संगमनेर 79.57 टक्के, अकोले 69.65 टक्के, राहुरी 69.14, कोपरगाव तालुक्यात 84 टक्के नोंदणी झाली आहे.