Nagar News : पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसाचा धिंगाणा | पुढारी

Nagar News : पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसाचा धिंगाणा

पाथर्डी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी पोलिस ठाण्यातील एका मद्यधुंद झालेल्या पोलिस कर्मचार्‍याने शुक्रवारी पोलिस ठाण्याच्या आवारात धिंगाणा घातला.यासंदर्भात शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा पोलिसांनी नोंदविला नव्हता. दरम्यान, मद्यधुंद होऊन धिंगाणा घालणार्‍या या पोलिस कर्मचार्‍याला रक्त तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवारी पाठविण्यात आले होते.

शुक्रवारी दुपारी हा मद्यधुंद झालेला पोलिस कर्मचारी पोलिसा ठाण्यात आला. त्याने काही पोलिस व तेथे आलेल्या नागरिकांना शिवीगाळ केली. झिंगाट झालेल्या या पोलिस कर्मचार्‍याला पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र, या पोलिसाने कोणाचीच ऐकले नाही. या कर्मचार्‍याने या अगोदरही असाच प्रकार केला असून, दरवेळी त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार झाला. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या काही कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी घेऊन काही कैद्यांचे नातेवाईक पोलिस ठाण्यात आले होते.

मात्र, या नातेवाईकांनाही या मद्यधुंद कर्मचार्‍याने शिवीगाळ केली. या नंतर या कर्मचार्‍याला घेऊन काही पोलिस कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात रक्त तपासणीसाठी घेऊन गेले होते.त्यानंतर हा कर्मचारी रजेवर गेला. पोलिस ठाण्याच्या आवारात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसाचा हा प्रताप या कॅमेर्‍यात कैद झाला असला तरीही या संदर्भात स्टेशन डायरीला कोणतीही नोंद का करण्यात आली हे समजले नाही. कायद्याचे रक्षण करणारेच पोलिस असे गैरवर्तन करतात, त्यावर आता वरिष्ठ पोलिस अधिकारी काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Crime News : एमआयडीसी परिसरात 30 हजारांची लुट

Pune News : देशात राज्यकर्त्यांविरोधात वातावरण : शरद पवार

Pune Crime News : फरपटत नेल्याने पोलिस हवालदार जखमी

Back to top button