काँग्रेसच्या वरिष्ठांनी आत्मचिंतन करावे : सत्यजित तांबे | पुढारी

काँग्रेसच्या वरिष्ठांनी आत्मचिंतन करावे : सत्यजित तांबे

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जर राजीनामा देण्याची वेळ येत असेल. तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशा शब्दांत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली.

संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा मंदिराजवळ माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या किर्तन कार्यक्रमासाठी सत्यजित तांबे उपस्थित राहिले होते. त्यावेळी ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

तांबे म्हणाले की, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे की नाही हे मला सांगता येणार नाही. मी यावर कुठल्याही प्रकारचे भाष्य करणार नाही. परंतु ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाबरोबर अनेक वर्ष काम केले असेल. आणि त्या ज्येष्ठ नेत्यांवर गटनेते पदाचा राजीनामा देण्याची वेळ येत असेल. तर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, अशी नाराजी तांबे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा 

Back to top button