बाभूळखेड्यात 4 लाखांची घरफोडी ; तपासासाठी दोन पथके

सव्वा लाखांचा नेकलेस घटनास्थळीच सापडला आहे
Burglary by breaking the lock at Chikhli
घरफोडीPudhai File Photo
Published on
Updated on

तालुक्यातील बाभूळखेडा शिवारात गुरूवारी (दि. 3) पहाटे घरफोडी करून चोरट्यांनी रोख रकमेसह 4 लाखांची ऐवज चोरून नेला आहे. सव्वा लाखांचा नेकलेस घटनास्थळीच सापडला आहे. बाभूळखेडा परिसरात शिवशंकर बाबूराव कडू व पत्नी असे दोघेच राहतात. गुरूवारी (दि.3) पहाटे 4.30 वाजता तिघा चोरट्यांनी वरच्या बाजूने जिन्याद्वारे घरात प्रवेश केला. चोरटयांनी केबल व लाथाबुक्क्यांनी कडू दाम्पत्यास बेदम मारहाण केली.

घरातील कपाट व इतरत्र उचकापाचक करून 10 हजार रोख रकमेसह 7 तोळ्यांचे सोन्याचे ागिने असा 5 लाख 20 हजारांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला. आरडाओरडा करू नये, म्हणून कडू दाम्पत्यांच्या तोंडात कापसाचे बोळे कोंबले होते. नेवासा पोलिसांनी शिवशंकर कडू यांच्या तक्रारीवरून चोरटयांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक धनंजय जाधव तपास करीत आहेत.

या चोरीचा तपास नेवासा पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या दोन पथकांनी सुरू केला आहे. घटनास्थळी श्वानपथक व ठसेतज्ज्ञानाही पाचारण करण्यात आले होते. अपर पोलिस अधीक्षक वैभव कल्लूबर्मे व शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या आहेत.

घटनास्थळी सापडला नेकलेस!

घरफोडी करून चोरट्यांनी 7 तोळ्याचे दागिने नेल्याचे तक्रार दाखल करण्यात होती. पंरतु दुपारी घटनास्थळीच दोन तोळ्याचा सोन्याचा नेकलेस पोलिसांना तपासा दरम्यान मिळून आला. 7 तोळ्यांपैकी 2 तोळे मिळाल्याने कडू दाम्पत्यांला दिलासा मिळाला.

पोलिसांना मिळाले धागेदोरे

बाभूळखेडा चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. लवकरच आरोपीपर्यंत पोहोचू असा विश्वास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news