Mazi Vasundhara Campaign | संगमनेरातील १० ग्रामपंचायतींना ४ कोटींची बक्षिसे

माझी वसुंधरा अभियानात पालिकेचाही गौरव; राज्यात सर्वाधिक पारितोषिकांचा बहुमान
Mazi Vasundhara Campaign
Mazi Vasundhara CampaignFile Photo
Published on
Updated on

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीयबदल विभागाने राबविलेल्या माझी वसुंधरा अभियानांर्गत संगमनेर तालुक्यातील १० ग्रांमपंचायतींनी ४ कोटी रूपयांचे बक्षिसे पटकावून राज्यात विक्रम प्रस्थापित केला आहे.

दरम्यान, संगमनेर नगर परिषदेलाही उत्तेजनार्थ बक्षिस जाहीर झाले आहे. एकाच तालुक्याला मिळालेली ही सर्वाधिक बक्षिसांची संख्या पाहता प्रशासकीय कारभारावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्य सरकारने पृथ्वी, वायू, जल, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित 'माझी वसुंधरा अभियान ४.० हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविले.

या अभियानात राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्थांसह २२, २१८ ग्रांमपंचायती अशा एकूण २२, ६३२ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात तीन गटांमध्ये संस्थाचे डेस्कटॉप व फिल्ड मूल्यमापन करण्यात आले.

अमृत गटासाठी ११, ६०० गुण, नगर परिषदा व नगर पंचायतीसाठी ११, ४०० तर ग्रांमपंचायत गटासाठी ११, ६०० गुणांचे मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात आले. यानंतर शासनाने बक्षिसे जाहीर केली.

१० हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गटात घुलेवाडी ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर व्दितीय क्रमांक पटकाविला. या ग्रांमपंचायतीला दीड कोटी रूपयांचे बक्षिस मिळणार आहे. विशेष असे की, भूमी थीमटीकमध्ये घुलेवाडी ग्रांमपंचायतीनेच राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावून ७५ लाख रुपयांचे बक्षिस मिळविले आहे.

नाशिक विभागस्तरावरील गुंजाळवाडी ग्रांमपंचातीला १० गुणानुक्रम मिळाला आहे. या यशाव्दारे १५ लाख रुपयांचे बक्षिस प्राप्त होणार आहे. ५ ते १० हजार लोकसंख्येच्या ग्रांमपंचायतीत विभागस्तरावर धांदरफळ बुद्रुक ग्रांमपंचायतीने १५ गुणानुक्रमांक मिळवून १५ लाख रूपयांचे बक्षिस पटकाविले आहे. २५०० ते ५ हजार लोकसंख्येच्या ग्रांमपंचायत गटामध्ये राज्यस्तर उत्तेजनार्थ पारितोषक खांडगाव ग्रांमपंचायतीला १५ लाख रूपयांचे बक्षिस मिळणार आहे.

नाशिक विभागात पेमगिरी व चिंचोली गुरव या ग्रांमपंचायतींना १५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. १५०० हजार ते २५०० लोकसंख्या गटामध्ये लोहारे ग्रामपंचायतीने विभाग स्तरावर यशस्वी होत १५ लाख रुपयांचे बक्षिस पटकाविले आहे.

१५०० पेक्षा कमी लोकसंख्येच्या ग्रांमपंचायतीत विभागस्तरावर चौरकोठे ग्रांमपंचायतीने १५ लाख रुपयांचे तर तिगाव ग्रांमपंचायतीने राज्यस्तरावर ५० लाख रूपयांचे तिसरे बक्षिस पटकाविले आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गटात नगर जिल्ह्याने व्दितीय तर नगरपरिषदेमध्ये संगमनेर नगरपालिकेला राज्यस्तरावर उत्तेजनार्थ बक्षिस मिळाले आहे.

घुलेवाडी ग्रामपंचायतीचा यशाचा डंका !

'घुलेवाडी ग्रामपंचायतीने १० हजारपेक्षा जास्त लोकसंख्या राज्यस्तरीय गटात व्दितीय दीड कोटी रुपये, भूमी थिमटिक राज्यस्तरीय प्रथम ७५ लाख तर नाशिक विभागस्तरावर १० व्या क्रमांकाचे तब्बल १५ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावित यशस्वी कार्याचा डंका पिटविला आहे, हे उल्लेखनिय।

Here are the meta keywords in English for the headline:

"Mazi Vasundhara campaign, Maharashtra government, Sangamner taluka gram panchayats, 4 crore prize money, environmental awards, state record achievement, sustainable village initiative, gram panchayats recognition, environment and climate change department, Sangamner panchayats Mazi Vasundhara"

These keywords highlight the environmental achievements and recognition for the gram panchayats in the campaign.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news