शरद पवार गटाकडून नगर जिल्ह्यात 21 इच्छुक !

राजेंद्र फाळके; पुण्यात 7 ऑक्टोबरला मुलाखती

21 aspirants call for candidature
इच्छुक pudhari
Published on
Updated on

लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि संगमनेर वगळता इतर 10 मतदारसंघांतून 21 इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असून, सोमवारी (दि. 7) पुणे येथे पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः त्यांच्या मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फाळके म्हणाले, की विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते. यात 21 जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील 21 सदस्यांचे पार्लमेंटरी बोर्ड इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे.

‘शिर्डी’वरही दावा!

महाविकास आघाडीत आम्ही जिल्ह्यात आठ जागा मागितल्या आहेत. याशिवाय शिर्डी मतदारसंघही आम्हाला दिल्यास, त्या बदल्यात काँग्रेसला ‘त्या’ आठपैकी एक मतदारसंघ देण्याची तयारी असल्याचे फाळके म्हणाले.

..तर विवेक कोल्हे प्रमुख उमेदवार!

कोपरगावातून विवेक कोल्हे संपर्कात आहेत का, या प्रश्नावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यांनी ‘तुतारी’ हाती घेतलीच तर ते जिल्ह्यात आमचे प्रमुख उमेदवार असतील, असे संकेत फाळके यांनी दिले.

‘नगर’चा सस्पेन्स कायम!

नगरमधून पक्षाला विजय हवाच आहे. सध्या कळमकर, डॉ. आठरे, तांबोळी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मात्र अन्य कोणी मागणी केली तर याबाबत पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, असे सांगून फाळके यांनी केडगावच्या कोतकरांबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला.

घुलेंच्या विषयावर पडदा?

शेवगाव-पाथर्डीतून अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांची उमेदवारी अंतिम समजली जात आहे. मात्र मध्यंतरी माजी आमदार चंद्रशेखर घुले हेदेखील ‘तुतारी’साठी इच्छुक असल्याची चर्चा होती. यावर फाळके यांनी ‘मलाही तसं समजलं; मात्र ढाकणे हेच उमेदवार असतील,’ असे सांगून घुलेंच्या विषयावर पडदा टाकला.

श्रीरामपूर, संगमनेरात इच्छुकच नाही!

शरद पवार गटाने आवाहन केल्यानंतरही संगमनेर आणि श्रीरामपुरातही एकही इच्छुक पुढे आलेला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असलेल्या या दोन मतदारसंघांवर पवार गटाचा कोणताही दावा नसेल, हे नक्की झाल्याचे समजते.

कोण आहेत इच्छुक

अकोले : अमित भांगरे, मधुकर तळपाडे.

कोपरगाव : दिलीप लासुरे, संदीप वर्पे

शिर्डी : रणजित बोठे, अ‍ॅड. नारायण कार्ले

नेवासा : डॉ. वैभव शेटे

शेवगाव-पाथर्डी : प्रताप ढाकणे, विद्या गाडेकर

पारनेर : राणी लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे

नगर शहर : डॉ. अनिल आठरे, अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी

श्रीगोंदा : बाबासाहेब भोस, राहुल जगताप, निवास नाईक, अण्णासाहेब शेलार

कर्जत : रोहित पवार

राहुरी : प्राजक्त तनपुरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news