नगर-सोलापूर महामार्गावर ४ वाहनांचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार, १० गंभीर जखमी

नगर-सोलापूर महामार्गावर ४ वाहनांचा भीषण अपघात; २ जण जागीच ठार, १० गंभीर जखमी
Published on
Updated on

कर्जत; प्रतिनिधी :  नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडेवस्ती येथे चार वाहनांचा गुरुवारी रात्री ९ वाजता भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवर असणारे कृष्णा मल्हारी बोरुडे (वय २५ वर्ष) राहणार कोकणगाव तालुका कर्जत तसेच क्रुझर मधील सोपान दिनकर काळे हे दोघेजण जागीच ठार झाले. इतर दहाजण गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकमुळे झाला.

या विषयी अधिक माहिती अशी की, नगरहून सोलापूरकडे जात असणारा मालट्रक क्रमांक टी एन ८८ एक्स ९२४३ याने भरधाव वेगाने गाडी चालवत कर्जत तालुक्यातील कोकणगाव जवळ असणाऱ्या बोरुडे वस्ती परिसरात नगरहून सोलापूरकडे जात असलेला ॲपे रिक्षा क्रमांक डी एम ४५५७ हिला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने ॲपे रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली. यानंतर पुढे दुचाकी जात होती त्याला देखील या ट्रकने पाठीमागून जोरात धडक दिली व अक्षरशः काही अंतर त्या दुचाकीला फरफटत नेले. दुचाकीस्वार कृष्णा मल्हारी बोरुडे ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.

दरम्यान त्याच वेळी सोलापूरहून नगरकडे जात असणार क्रुझर जीप क्रमांक एम एच ०९ बी एम ९८५९ ही समोरून येत होती. समोरील अपघात टाळण्याचा प्रयत्न क्रुझर ड्रायव्हर करत असताना या ट्रकने क्रुझर जीपला देखील ठोकले. यामध्ये क्रूजर मधील सोपान दिनकर काळे हा जागीच ठार झाला.

अपघाताची घटना समजताच त्या परिसरातील नागरिक व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावले. या ट्रकने दिलेल्या धडकेत किमान दहाजण गंभीररीत्या जखमी झाले. त्या सर्वांना तात्काळ रुग्णवाहिके मधून नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

या अपघातातील मुख्य आरोपी असणारा मालट्रक ड्रायव्हरने तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. अनेकजण गंभीर जखमी झाले. जखमी झालेले लोक यावेळी आरडाओरडा करत होती. अशा परिस्थितीमध्ये मालट्रक ड्रायव्हरने गाडी न थांबवता किंवा कोणतीही मदत न करता त्या ठिकाणावरून गाडी घेऊन पळ काढला. यानंतर पोलिसांनी त्या मालट्रकला पकडले, मात्र ड्रायव्हर पळून जाण्यात यशस्वी झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news