वर्ध्यांमध्ये खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना 200 कोटी कर्ज वाटप

वर्ध्यांमध्ये खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना 200 कोटी कर्ज वाटप

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : नियमित कर्जाची परतफेड केल्यानंतर नूतनीकरण करून शेतकर्‍यांना कर्ज पुरवठा करण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यातील नऊ हजारापैक्षा अधिक शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केली. त्या माध्यमातून कर्ज खात्याचे नूतनीकरण केलेल्या शेतकर्‍यांना कर्ज पुरवठ्याचा लाभही देण्यात आला आहे. दरम्यान चार हजारांवर नवीन खातेधारक शेतकर्‍यांना बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे.

दरवर्षी शेतकर्‍यांना बँकांकडून कृषी कर्ज पुरवठा केला जातो. खरीप हंगामात नवीन कर्ज घेण्यापूर्वी शेतकर्‍यांना जुन्या पीक कर्जाची परतफेड करणे गरजेचे असते. कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी दिसून येते. मागील वर्षीदेखील अनेक शेतकर्‍यांनी पीक कर्जाची उचल केली होती. त्यातील 9 हजार 759 शेतकर्‍यांनी कर्जाची परतफेड केली.

परतफेड केलेल्या शेतकर्‍यांचे कर्ज रिनीव्हल करण्यात आले. यामध्ये शेतकर्‍यांना 131 कोटी 62 लाख 56 हजार रुपये कर्जाचा लाभही देण्यात आला आहे. निहित कालावधीत कर्जाची परतफेड करणार्‍यांना नूतनीकरण करून कर्ज मंजूर करण्यात आले आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकर्‍यांकडे पीक कर्जाची थकबाकी कायम आहे. यावर्षी बँकांकडे नवीन 4 हजार 845 खातेधारक शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. नवीन खातेधारक शेतकर्‍यांना 67 कोटी 79 लाख 78 हजार रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील 14 हजार 461 शेतकर्‍यांना एकूण 199 कोटी 43 लाख 28 हजार रुपयांचा वित्त पुरवठा करण्यात आला आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news