मेट्रोचे काम करण्याआधी पर्यायी रस्ते तयार करा अन्यथा रास्तारोको आंदोलन करु : आमदार राजू पाटील 

मेट्रोचे काम करण्याआधी पर्यायी रस्ते तयार करा अन्यथा रास्तारोको आंदोलन करु : आमदार राजू पाटील 

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : कल्याण-तळोजा मेट्रोचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी कल्याण-शिळ महामार्गाला पर्यायी रस्ते तयार करा. पर्यायी रस्ते नसल्याने विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मेट्रोच्या कामामुळे विद्यार्थी, रुग्ण, प्रवासी आणि वाहन चालकांना याचा नाहक त्रास होत आहे. त्यामुळे पर्यायी रस्ते बांधून घ्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करु असा इशारा आमदार राजू पाटील यांनी दिला आहे. डोंबिवलीतील पाटीदार सभागृहातील बैठकीदरम्यान ते बोलत होते. (Dombivali News)

डोंबिवलीत कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवक जालिंदर पाटील आणि रमाकांत पाटील यांच्या पुढाकाराने या भागातील पाणी आणि रस्ते समस्यांवर बैठक बोलाविली होती. या बैठकीला आमदार राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि 27 गावांतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत बोलताना आमदार राजू पाटील यांनी या समस्या येत्या 15 दिवसांत निकाली काढून असा विश्वास व्यक्त केला. (Dombivali News)

कल्याण-तळोजा मेट्रोच्या कामाला माझा विरोध नाही. परंतु, आधी पर्याची रस्ते करा नंतर हे काम सुरु करा. अन्यथा पुढील सात दिवसांनी रास्ता रोको करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुन्हा डोंबिवलीतील कंपनीला आग लागली. तेव्हा घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या जाताना त्रास झाला. या ठिकाणी मेट्रोसाठी कल्याण-शिळ महामार्गाचा भाग कमी आहे. डोंबिवलीतील इंडो अमाईन्स कंपनीला लागलेल्या आगीच्या घटनेवर आमदार राजू पाटील यांनी सरकारवर सडेतोड टिका केली. हे साधे फेरीवाले हटवू शकत नाहीत, तर कंपन्या हटवू शकतील की नाही या बाबत मी साशंक झालो आहे. डोंबिवलीतील कंपन्यात सातत्याने स्फोट आणि आगी लागण्याच्या घटना घडत आहे. अमुदान कंपनीच्या स्फोट आणि आगीच्या घटनेनंतर कंपन्या हटवू असे सरकारने सांगितले होते. (Dombivali News)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news