संतापजनक! रक्षकच बनले भक्षक; पोलिसाने केली तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

संतापजनक! रक्षकच बनले भक्षक; पोलिसाने केली तरुणीकडे शरीरसुखाची मागणी

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : प्रेमप्रकरणात धोका देणाऱ्या प्रियकराच्या विरोधात तक्रार करण्यासाठी एक तरुणी भंडारा पोलीस ठाण्यात गेली होती. तक्रार दाखल करुन घेण्यास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांनी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. या प्रकरणात बागुल यांच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणी  नागपूर येथे इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होती. तिथे तिची ओळख एका तरूणासोबत झाली. दरम्यान ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही वर्षांनंतर तरुणीने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने तिला नकार दिला. त्यानंतर तिने प्रियकराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तरुणीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी एका महिलेसोबत भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्याकडे गेली होती. तेव्हा भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी बागुल यांनी तरुणीला एकटे येण्यास सांगितले.

तरुणीला पोलीस अधिकाऱ्याच्या उद्देश न कळल्याने ती पुन्हा तक्रार देण्यासाठी बागुल यांच्याकडे गेली. त्यावेळी त्यांनी तिचे काम करून देण्यासाठी शरीर सुखाची मागणी केली. या प्रकारामुळे खचून गेलेल्या तरुणीने सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम यांना भेटून घडलेला सर्व प्रकार सांगितला. परमानंद मेश्राम यांनी या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांची भेट घेतली. अखेर तरुणीच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे शहरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news