Lok sabha Election 2024 Results : वर्षा गायकवाड यांनी 56 हजार मतदानांची लीड तोडत मिळवला झंझावती विजय

Lok sabha Election 2024 Results : वर्षा गायकवाड यांनी 56 हजार मतदानांची लीड तोडत मिळवला झंझावती विजय

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबई उत्तरमध्य लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकालावर लागुन होते. या मतदार संघातील मतमोजणी आता पूर्ण झाली आहे. मुंबई उत्तरमध्य लोकसभेतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या आहेत. वर्षा गायकवाड यांनी भाजपचे उमेदवार वकिल उज्वल निकम यांचा पराभव करत आपला संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. याठिकाणी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड तर महायुतीकडून भारतीय जनता पक्षाने वकील उज्वल निकम यांना तिकीट दिले होते. या जागेसाठी सुरुवातीपासुनच  दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली.

उत्तर मध्य मुंबईत मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा काही काळासाठी वर्षा गायकवाड यांनी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर भाजपच्या उज्ज्वल निकम यांनी आपले मताधिक्य वाढवत नेले. मध्यंतरीच्या काळात उज्ज्वल निकम यांचे मताधिक्य 56 हजारापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे वर्षा गायकवाड यांचा पराभव होणार, अशी चर्चा होऊ लागली होती. शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी जोरदार मुसंडी मारत निकम यांचे 56 हजार मतांची आघाडी तोडून दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबत काँग्रेसने अनेक वर्षांनंतर मुंबईमध्ये लोकसभेची जागा मिळवली आहे.

पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये वर्षा गायकवाड यांनी आघाडी 56 हजारावरुन प्रथम दीड हजारापर्यंत आणि नंतर 700 मतांपर्यंत खाली आणली. शेवटच्या फेरीत उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात अवघ्या 176 मतांचा फरक होता. त्यामुळे कोण जिंकणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर वर्षा गायकवाड यांनी निसटती आघाडी घेत उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. वर्षा गायकवाड यांच्या विजयामुळे मुंबईत महाविकास आघाडीच्या विजयी खासदारांची संख्या पाचवर पोहोचली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news