काळजी घ्या ! राज्याला बसणार उन्हाचा चटका; दोन दिवसांपासून पाऱ्यात वाढ | पुढारी

काळजी घ्या ! राज्याला बसणार उन्हाचा चटका; दोन दिवसांपासून पाऱ्यात वाढ

पुणे : विदर्भातील काही भागांत गेल्या दोन दिवसांपासून गारपीट होत आहे. मात्र, उर्वरित भागात कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होत असून, पुढील दोन दिवसांपासून पाऱ्यात वाढ होणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या बहुतांश भागात गारपीट होत आहे. ही गारपीट आणखी दोन दिवस होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या उत्तर तेलंगण भागावर चक्रीय स्थिती आहे. तर केरळ ते तेलंगण भागापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याबरोबरच ईशान्य मध्य प्रदेश ते आसामपर्यंत द्रोणीय स्थिती आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झारखंडपासून ते पूर्व विदर्भ पार करून पश्चिमी चक्रावात आणि चक्रीय स्थिती तयार झाली होती. त्याचा प्रभाव कायम आहे. या प्रभावामुळेच विदर्भात गारपीट होत आहे.

हेही वाचा

Back to top button