महत्त्वाची बातमी ! विधीज्ञ असीम सरोदे करणार अमोल शिंदेला कायदेशीर मदत | पुढारी

महत्त्वाची बातमी ! विधीज्ञ असीम सरोदे करणार अमोल शिंदेला कायदेशीर मदत

पुढारी ऑनलाईन : काल नवीन संसदेत काही तरुणांनी प्रेक्षक गॅलरीमधून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धाव घेतली. आत हा गोंधळ सुरू असताना  संसदेच्या बाहेरही दोन जणांनी स्मोक कॅन फोडत घोषणाबाजी केली. यामध्ये अकोल्याच्या अमोल शिंदे या तरूणाचाही समावेश आहे. अमोल सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर UAPA अंतर्गत कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर येताना दिसते आहे. वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेचे वकीलपत्र घेणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असीम म्हणतात,

‘ अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार.

अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल.

अमोल चा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते.

त्यामुळे मला Dhananjay RamKrishna Shinde यांनी लिहिलेले खालील विचार पटले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली? #अमोलशिंदे #संसद #लोकशाही

कोण आहे अमोल शिंदे ?

कालपासून चर्चेत असलेला अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील नवकुंडाची झरी या गावचा आहे. त्याचे वडील एका धार्मिक संस्थानात सफाई कामगार आहेत तर आई गृहिणी आहे. अमोलला दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत. अमोलने दिल्लीला जाताना पोलिसभरतीला जात आहे इतकंच घरी सांगितलं होतं. या प्रकरणी अमोलच्या घरच्यांचीही चौकशी तपास यंत्रणांनी केली आहे.

संबंधित बातम्या :

Back to top button