

पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा तिसरा दिवस आहे. शिंदे गटाकडून जेठमलानी यांचा युक्तिवाद संपला आहे. त्यानंतर मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुन्हा कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद सुरू आहे. त्यानंतर आज हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे जाणार का, याची गरज आहे का? या मुद्द्याने उत्कंठा कायम ठेवली आहे.
Maharashtra Political Crisis : नबाम प्रकरणानुसार नोटिस दिल्यानंतर अध्यक्षांना अधिकार नाहीत. अपात्रतेबाबत घटनेत विस्तृत नियमाली आहे, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू आहे. सरकार कायदेशीर असतानाही पाडले गेले. त्यानंतर आता शिंदे गट-भाजपकडून सरकार सत्तेवर आले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत याला पुन्हा मागे कसे नेणार.