

पुढारी ऑनलाईन डेस्क : हृदयाच्या त्रासामुळे त्रस्त असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आज (दि.२७) उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. तेथे त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेतून राज्यातील ठाकरे सरकारवर हल्लाबोल करत रान उठवले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. राणे यांना अटकही करण्यात आली होती.त्यामुळे जन आशीर्वाद यात्रा थांबली होती. आता ही यात्रा शनिवारीपासून सिंधूदुर्ग येथून सुरू होत आहे. कणकवली येथे ही यात्रा जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राणे रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.