चित्रा वाघ संजय राऊतांवर भडकल्या! खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? | पुढारी

चित्रा वाघ संजय राऊतांवर भडकल्या! खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : चित्रा वाघ : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात राहुल गांधी यांनी पीडिताच्या आईचा फोटो ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून संजय राऊत यांनी राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाचा ट्विटरवर फोटो ठेवणे हा गुन्हा आहे का? असा सवाल केला होता.

आता या प्रकरणावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

त्यांनी व्हिडिओ पोस्ट करून म्हटले आहे की, सर्वज्ञानी संजय राऊत यांना राहुल गांधी यांनी कौतुकाची थाप काय दिली तर आपला त्यावर स्वामीनिष्ठा त्यावर आपली परस्वामीनिष्ठा उफाळून येणे स्वाभाविकच आहे. खायचं कुणाचं आणि गायचं कुणाचं? हे आपलं वागणं खरोखर कौतुकास्पद आहे, पण स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी बलात्कारासारख्या गंभीर विषयाचंही राजकीय भांडवल करणं हे निंदनीय आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, पुजा चव्हाणच्या मारेकऱ्यांना कोण अभय देतं आहे आणि पुणे पोलिसांची त्यात कशी भूमिका राहिली आहे, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.

नव्या अभिनेत्रीला संधी देतो म्हणून शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला आत्ताच लोकांनी चोप दिला. महाविकास आघाडीतील किती जणांचे हात महिलांविरोधी कृत्यांमध्ये बरबटलेले आहेत, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.

आपल्या अत्याचाराविरूद्ध सुद्धा माझ्या एका भगिनिने न्याय मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत. आम्ही आता या अत्याचारी प्रवत्तीविरूद्ध लढायचं ठरवलं आहे. त्यामुळंच की काय आपल्याला भितीपोटी असे दाखले द्यावे लागतात असे त्यांनी म्हटले आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

राहुल गांधी यांनी ट्विटरवरील फोटो काढावा म्हणून राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले.

ही एक प्रकारची हुकूमशाहीच आहे.त्या कुटुंबाची माहिती विरोधी पक्षातील नेता देत असेल तर गुन्हा आहे का?

पीएम मोदीही निर्भयाच्या कुटुंबांना भेटले होते. तेव्हाही ते फोटो प्रसिद्ध झाले होते. तेव्हा ते फोटो काढा म्हणून कोणी पत्र पाठवले नव्हते.

हे ही वाचलं का?

 

Back to top button