माढ्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर | पुढारी

माढ्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर

टेंभुर्णी : पुढारी वृत्तसेवा माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांतील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी आमदार स्थानिक विकास योजनेतंर्गत विकासकामे करण्यासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली. याविषयी सविस्तर माहीती देताना आ. शिंदे यांनी सांगितले की, ग्रामीण भागांतील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे, वाड्यावस्त्यांवरील रस्ते काँक्रिटीकरण, खडीकरण व मुरमीकरण करणे तसेच पेव्हिंग ब्लॉक बसविणे,भुयारी गटार करणे, सामाजिक सभागृह, सभामंडप, हायमास्ट दिवे बसविणे अशा विकासकामांसाठी माढा विधानसभा मतदारसंघातील गावांना निधी मंजूर केलेला आहे. या कामांना निधीची प्रशासकीय मंजुरी मिळाली असल्याने या कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने ही कामे सुरू होणार असल्याचेही आ. शिंदे यांनी सांगितले.

यामध्ये माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्री वेळापूरकर महाराज मठ येथे ग्रा. पं. जागेत सभामंडप बांधणे-13 लाख, दारफळ येथील खंडोबा देवस्थान मंदिर येथे ग्रा.पं.जागेत सभामंडप बांधणे-10 लाख, माढा येथील सिटी सर्व्हे नं.2199 मंजूर रेखांकनातील अंतर्गत रस्ते करणे-10 लाख, मानेगाव येथील खैराव-मानेगाव (शिव रस्ता) मजबुतीकरण करणे-3 लाख. वेणेगाव येथील कदम वस्ती येथील पांडुरंग मंदिरासमोर ग्रा.पं.जागेत सभामंडप बांधणे-7 लाख, वेणेगाव येथील महादेव कृष्णा शिंदे वस्ती येथे लक्ष्मीआई मंदिरासमोर सभामंडप बांधणे-7 लाख, कुंभेज येथे स्मशानभूमीजवळ ग्रा.पं.जागेत पाणीपुरवठा करणे-7 लाख, माढा येथील जि.प.प्राथ.मुलांची शाळा नं.1 येथे 10 संगणक -7 लाख, मिटकलवाडी येथील जि.प.शाळेसाठी प्रोजेक्टर नग 1 व स्क्रिन नग 1 व संगणक नग 5 – 4 लाख, व्होळे (खु) येथील छत्रपती शिवाजी सार्व.वाचनालय येथे फर्निचर, पुस्तके देणे- 96 हजार, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील बिरोबा मंदिरासमोर ग्रा.पं.जागेत सभामंडप बांधणे-10 लाख, चिंचोली (भोसे), ता. पंढरपूर येथील पवार मळा मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे-5 लाख, देगाव येथील महादेव मंदिरासमोर भुईवस्ती दलितवस्ती येथे सभामंडप बांधणे-8 लाख, मेंढापूर येथील शिंदे/झेंडे वस्ती (दलित वस्ती) येथील ग्रा.पं.जागेत सभामंडपाची देखभाल दुरुस्ती करणे-10.75 लाख याप्रमाणे कामांचा सामावेश आहे.

Back to top button