कर्मचारी, सभासदांच्या मदतीने कारखाना यशस्वीपणे चालवू : शिवानंद पाटील

कर्मचारी, सभासदांच्या मदतीने कारखाना यशस्वीपणे चालवू : शिवानंद पाटील

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा कारखान्याच्या वाटचालीस सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी सभासद व कामगार यांनी सहकार्य केले तरच हे सर्व होऊ शकते. सर्वांनी मोलाचे सहकार्य केल्याने आम्ही येथे येऊ शकलो. सर्व कामगार व सभासद यांचे असेच सहकार्य रहावे, अशी अपेक्षा नूतन संचालक शिवानंद पाटील यांनी व्यक्त केली. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक मंडळ कारखान्यावर आल्यानंतर त्यांचे कारखाना प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

या प्रसंगी ते बोलत होते. नवनिर्वाचित संचालक मंडळांनी सुरुवातीस स्व.कि.रा.मर्दा उर्फ मारवाडी वकील आणि स्व.रतनचंद शहा शेठजी यांचे पुतळयास पुष्पहारअर्पण करुन दर्शन घेतले. नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत कारखान्याचे माजी चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, चालू गळीत हंगामाकरीता मदत करण्याकरीता बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहूल शहा, जिजामाता पतसंस्थेचे चेअरमन रामकृष्ण नागणे, माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि मी स्वत: मदत करुन कारखान्यास पूर्वीचे वैभव प्राप्त करु.

सर्वाचे सहकार्याने ही अपेक्षा पूर्ण होईल असे मत व्यक्त केले. यावेळी कारखान्याचे नूतन संचालक मंडळ तसेच रतनशहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, अजित जगताप, बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन दामोदर देशमुख, दामाजी कारखान्याचे माजी संचालक रामकृष्ण नागणे, प्रकाश गायकवाड, भारत पाटील, मारुती वाकडे, इन्नूस शेख, किसन सावंजी, अरुण किल्लेदार, रामेश्वर मासाळ लतिफ तांबोळी, संभाजी गावकरे, यांचेसह मोठ्या प्रमाणात सभासद,शेतकरी व कामगार उपस्थित होते. आभार कारखान्याचे कार्यालय अधिक्षक दगडू फटे यांनी मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news