उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार | पुढारी

उत्पादकांच्या पाठबळावर यंदाही लोकनेते गाळपात बाजी मारणार

अनगर : पुढारी वृत्तसेवा लोकनेते कारखान्यास दरवर्षी विक्रमी टन ऊस गाळपासाठी देणारे सुजाण ऊस उत्पादक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठबळावर लोकनेते कारखान्याने गत वर्षीच्या गळीत हंगाम विक्रमी गाळप यशस्वी केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असून नोंद दिलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस वेळेत गाळपासाठी आणला जाणार असल्याची ग्वाही ‘लोकनेते शुगर’चे चेअरमन बाळराजे पाटील यांनी दिली.

मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याचा सन 2022-2023 गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व कारखान्याचे कर्मचारी सी. एन. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
बाळराजे पाटील पुढे म्हणाले की, मोहोळसह पंढरपूर, बार्शी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विश्‍वासास पात्र ठरत कारखान्याचे कामकाज सुरू असून इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत कारखाना ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सर्व सोयी देत असून कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पाठबळावर आपण प्रत्येक हंगामात शेतकरी सभादांचा ऊस वेळेत गाळप करीत आहोत. गतवर्षीच्या तुलनेत यंदाही मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता असून नोंद दिलेल्या सर्व ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस गाळपासाठी आणला जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, लक्ष्मण मुखेकर, मुख्य शेती अधिकारी एम.आय. देशमुख, के.डी. वैद्य, संजय खुडे, संजय कासार, मदने, राजशेखर गायकवाड, नेताजी बोडके, सोमनाथ म्हेत्रे, अनंत उरणे, अनिल पवार, हनुमंत पासले, अजित बोडके आदी उपस्थित होते. गाळप हंगाम 2022-23 साठी कारखान्याच्या शेती विभागामार्फत नुकतेच ऊस तोडणी वाहनांच्या वाहतूक करारास सुरुवात करण्यात आली.

त्यासाठी कारखान्याच्या सन 2022-2023 गळीत हंगामाचे मिल रोलर पूजन, तसेच इतरही विविध तांत्रिक बाबींची पडताळणी बाळराजे पाटील यांनी कारखाना कार्यस्थळावर केली. यावेळी त्यांनी सर्व विभागांचा आढावा घेतला. संस्थापक अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाचा गळीत हंगामही विक्रमी गाळपाने यशस्वी करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादकांनी कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Back to top button