

सोलापूर : 'अग्निपथ' योजना बेरोजगार युवकांची क्रूर थट्टा करणारी आहे. सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न युवकांचे असते. अनेक वर्ष त्यासाठी घालवतो आणि मोदी सरकार फक्त चार वर्षांत आर्मी मध्ये ठेवून युवकांना इतर नोकरीचे गाजर दाखवुन वार्यावर सोडत आहे, असा आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी केला.
सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अग्निपथ योजनेच्या विरोधात शनिवारी स्टेशन रोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रकाश वाले, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ, बाबा मिस्त्री, चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, प्रदेश चिटणीस अलका राठोड, किसन मेकाले आदी उपस्थित होते. यावेळी आ. शिंदे म्हणाल्या, सैनिकांनी आयुष्यातील महत्त्वाचे चार वर्षे देशासाठी घालवल्यानंतर मोदी सरकार कुठलीही मदत न देता फक्त काही रक्कम हातात देऊन त्यांना खाजगी नोकरीचे गाजर दाखवत आहेत.
हे अतिशय निंदनीय आहे ही शोकांतिका आहे. यावेळी शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, प्रवीण निकाळजे, हाजी तौफिक हत्तुरे, नरसिंग कोळी, मा. नगरसेविका अनुराधा काटकर, वैष्णवीताई करगुळे, फिरदोस पटेल, माजी महापौर आरिफ शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.