

बार्शी : पुढारी वृत्तसेवा बार्शी नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावर 1 ऑगस्ट 2014 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात नगरसेवक विजय राऊतांसह तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे यांनी फेटाळला आहे.
हल्लाप्रकरणी बार्शी शहर पोलिसात विविध कलमान्वये विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दिपक राऊतच्या अटकपुर्व जामीनावेळी तत्कालीन तपास अधिकारी चाऊस यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मृदुला भाटकर यांनी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते.
तसेच फिर्यादीने संबंधीत गुन्ह्याची कागदपत्रे मागुनही न दिल्यामुळे माहिती अधिकारान्वये पुणे खंडपिठाच्या आदेशानव्ये माहिती घ्यावी लागली होती. दरम्यान चाऊस यांनी विजय राऊत, दिपक धावारे, रणजित चांदणे यांचे नावे कलम 169 प्रमाणे वगळण्याचा अहवाल व इतरां विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयाकडे सादर केले होते..