पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी वार्ड रचना या अगोरदच जाहीर केलेली आहे. तर प्रभाग रचनेसुार पंढरपूर नगरपरिषदेत 18 प्रभाग व 36 सदस्य संख्या आहे. या 36 सदस्यांमध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती(महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोमवार, दि. 13 रोजी काढण्यात आले. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जाती या प्रवर्गाकरीता 4 प्रभागात 4 जागा (यामध्ये 2 जागा महिलांकरिता) व अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता 2 प्रभागात 2 जागा (यात 1 जागा महिलेकरिता) राखीव ठेवण्यात आली आहे. तर ऊर्वरित 12 प्रभाग हे सर्वसाधारणसाठी आहेत.
पंढरपूर नगरपरिषदेची एकूण लोकसंख्या 98 हजार 923 इतकी आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात आलेली आहे. शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीची लोकसंख्येनुसार त्यांच्याकरिता 4 जागा राखीव आहेत. यामध्ये 2 महिलांसाठी जागा आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातीप्रवर्गाच्या लोकसंख्येनुसार याप्रवर्गाकरिता 2 जागा असून, यात 1 जागा महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. याचे आरक्षण चिठ्ठीव्दारे निश्चित करण्यात आले. तर राहिलेल्या प्रभागात 15 जागा सर्वसाधारण महिलेसाठी आहेत.
त्यामुळे पंढरपूर नगरपषिदेसाठी यावेळेस एक प्रभाग तर 2 जागा वाढल्या आहेत.
त्यामुळे निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 36 झाली आहे. यामध्ये 50 टक्के जागा महिलांसाठी आहेत. यात 2 जागा अनुसूचित जातीकरिता, तर 1 जागा अनुसूचित जमातीकरिता, 15 जागा सर्वसाधारण मलिांसाठी आहेत. सदरची आरक्षण सोडत ही प्रांताधिकारी तथा प्रशासक गजानन गुरव उपस्थितीत काढण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अरविंद माळी,उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर, चिदानंद सर्वगोड आदीसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
या प्रभागांत एससी, एसटीचे आरक्षण
अनुसूचित जातीचे(एससी) आरक्षण हे प्रभाग क्र. 6, 11, 14,17 या चार प्रभागांमध्ये काढण्यात आलेले आहे.यामध्ये 4 जागा असून यात 2 जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातींसाठी(एसटी) आरक्षण हे प्रभाग क्र.4 व 9 मध्ये काढण्यात आले आहे. यात दोन जागा असून, एका जागेचे आरक्षण हे महिलेसाठी राखी आहे.
15 ते 21 जूनपर्यंत हरकती दाखल करता येणार
पंढरपूर नगरपरिषदेच्या सन 2022 मध्ये होणार्या सार्वजनिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती(महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी सोमवारी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणावर हरकती अथवा सुचना सादर करण्यासाठी दि. 15 ते 21 जून पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. हरकती व सुचना मुख्याधिकारी यांच्याकडे, निवडणूक कार्यालयात सादर कराव्यात