मंगळवेढा : पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी 65 लाखांचा निधी | पुढारी

मंगळवेढा : पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी 65 लाखांचा निधी

मंगळवेढा : पुढारी वृत्तसेवा मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांना जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी 13 कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली. निधी मंजूर गावांमध्ये पाणी पुरवठा योजना अधिक सुलभ आणि विस्तारित करण्याच्या अनुषंगाने हा निधी मार्गी लागणार आहे. या योजनेंतर्गत मंजूर निधीच्या माध्यमातून गावामध्ये पाणीटाकी उभी करणे, पाण्याचे व्यवस्थापन होण्यासाठी घरोघरी पाणीनळ बांधणे आदी पाणीपुरवठा साधने विकसित करण्यासाठी हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आ. आवताडे हे विराजमान झाल्यापासून त्यांनी आरोग्य, रस्ते व पाणी या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून विविध मार्गांनी शासनदरबारी असणारा निधी मतदारसंघामध्ये खेचून आणला आहे.

ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना अत्यंत आवश्यक आहे. जनतेची नेमकी हीच गरज ओळखून आ. आवताडे यांनी सतत पाणीपुरवठा विभागाकडे आपला राबता ठेवून या भरीव निधीची तरतूद आपल्या पदरात पाडून घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ता बदल झाल्यापासून शासनाच्या निरनिराळ्या खात्यामार्फत आ. आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणल्याने मतदारसंघातील धोरणात्मक विकासाची चक्रे अजून गतिमान होणार असल्याचे चित्र मतदारसंघामध्ये दिसत आहे.

मंजूर निधी व गावांची नावे – अरळी 46 लाख 77 हजार, बोराळे 92 लाख 68 हजार, मुंढेवाडी 42 लाख 22 हजार, रड्डे 1 कोटी 28 लाख 86 हजार, उचेठाण 96 लाख 69 हजार, येड्राव 1 कोटी 18 लाख 63 हजार, देगांव 49 लाख 72 हजार, धर्मगांव 61 लाख 68 हजार, गुंजेगाव 1 कोटी 73 हजार, हुन्नूर 1 कोटी 24 लाख 53 हजार, लवंगी 57 लाख 19 हजार, लेंडवे चिंचाळे 30 लाख 25 हजार, मानेवाडी 72 लाख 17 हजार, निंबोणी 1 कोटी 5 लाख 76 हजार, सलगर बु. 1 कोटी 19 लाख 17 हजार, सोड्डी 55 लाख 41 हजार, तामदर्डी 63 लाख 4 हजार, अशा स्वरूपात निधी मंजूर झाला आहे.

Back to top button